….म्हणून सासूने चावले सुनेचे बोट

वृत्तसंस्था – सासू-सुनेमध्ये भांडण होणे यात काही नवीन नाही.पण हे भांडण कोणत्या थराला जाऊ शकतील याची आपण कल्पना ही करू शकत नाही. नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनेने जेवायला देण्यास उशीर केला म्हणून एका सासूने चक्क तिचे बोट चावल्याचे समोर आले आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली आहे. ३२ वर्षाची प्रिती भारती आपल्या बाळाला स्तनपान देत असताना तिच्या ६५ वर्षीय सासूने आपल्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले. त्यावेळी प्रिती हिने स्तनपान झाल्यानंतर जेवण बनवते असे सांगितले. मात्र त्याआधीच सासूने सुनेच्या उजव्या हाताचे बोट जोरात चावले.

पोलिसांना या विषयाची माहिती मिळाल्य़ानंतर ते त्वरीत संबंधित ठिकाणी पोहोचले. याप्रकरणी सुनेने सासूच्या विरोधात तक्रार दाखल केली असून तिच्याविरोधात कलम ३२३, कलम ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे. इज्जतनगर येथील पोलिस अधिकारी उपेंद्र सिंह यांनी या प्रकरणाची माहिती दिली. प्रितीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चावा घेतल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु असून ती पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like