…म्हणून श्रीदेवी साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या तोंडावर थुंकल्या होत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना साऊथमध्ये देवासारखं पुजलं जातं. रजनीकांत यांच्यासोबत एक धक्कादायक पण तितकाच मजेदारही म्हणता येईल असा किस्सा घडला होता. अनेकांना हा किस्सा माहितीही नसेल. कारण हा किस्सा वाचून अनेकांना विश्वासही बसणार नाही की, खरचं हे असं झालं होतं म्हणून ’16 Vayathinile’ या सिनेमातील एका सीनच्या शुटींगदरम्यानचा हा किस्सा आहे. हा सिनेमा नेहमीच लक्षात ठेवला जाईल असा आहे.

image.png

या सिनेमातील एक सीन असा होता की, श्रीदेवी यांना रजनीकांत यांच्या तोंडावर थुंकायचे होते. परंतु अनेक रिटेक घेऊनही हा सीन परफेक्ट येत नव्हता. यानंतर रजनीकांत स्वत: श्रीदेवीला म्हणाले की, “तू ये आणि खरोखरच माझ्या तोंडावर थुंक, तरच सीनमध्ये परफेक्शन येईल.” रजनीकांतच्या मते, यानंतर शुटींगदरम्यान कोणीही त्यांच्याशी बोलत नव्हतं. रजनीकांत म्हणतात की, “त्यावेळी सर्वजण माझ्याशी असे वागत होते जसा मी न्यूकमर आहे. एवढंच काय तर सिनेमाचे निर्माते एस ए राजकन्नु यांच्यासोबतही माझी भेट सिनेमा रिलीज होण्याच्या काही महिने आधीच झाली होती.

image.png

राजकन्नु मला म्हणाले होते की, “आपल्याला या सिनेमाचे कलेक्शन कमल हसन यांना द्यायला हवे. कारण त्यांच्या विश्वरुपम या सिनेमाच्या प्रदर्शनाला अडचणी येत आहेत. कमल हसन यांच्या मते जेव्हा आपला सिनेमा ’16 Vayathinile’ रिलीज होणार होता त्याआधी लोक म्हणत होते की, हा सिनेमा फ्लॉप होणार आहे. इतकेच नाही तर, एकदा जेव्हा मी स्टुडिओतून घरी चाललो होतो तेव्हा एका दुचाकीवरून जाणाऱ्या माणसाने मला म्हटले होते की, हा सिनेमा खड्ड्यात जाणार आहे. परंतु नंतर हा सिनेमा ब्लॉकबास्टर म्हणून सिद्ध झाला.”

image.png

Loading...
You might also like