पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ १० वस्तूंशिवाय नाही राहून शकत भारतीय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपासून भारत – पाकिस्तान मध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारने आयात शुल्क वाढवून २०० टक्के केला. त्यामुळे देशात आयात होणाऱ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होत आहे. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या पाकिस्तानातून भारतात येतात. ज्याचा वापर आपण रोजच्या जिवनशैलीत करीत असतो. अशा सामानांमध्ये ताजी फळं, सिमेंट तसेच चामड्याच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू मोठ्या प्रमाणात सीमेपलीकडून आणल्या जातात आणि या वस्तू देशात पसंत देखील केल्या जातात.

कोणत्या आहेत या १० पाकिस्तानी वस्तू

१) ताजी फळं

पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात फळं भारतात मागवली जातात. ज्या सुका मेवा, टरबूज आणि इतर फळांचा समावेश होतो. पाकिस्तानातील या ताज्या फळांचा भारतात एक मोठा बाजार देखील आहे. एव्हढेच नाही तर पाकिस्तानातील आंबा देखील भारतात मोठ्या प्रमाणात पसंत केला जातो. पाकिस्तानातून येणारी फळं सर्वप्रथम काश्मीर किंवा दिल्ली येथील फळबाजारात येतात.

२) सैंधव मीठ

विशेषतः व्रत वैकल्यांच्या काळात वापरले जाणारे हे मीठ पाकिस्तानातून मागवले जाते.

३)मेडिकल उपकरणे

आपल्या देशात वापरण्यात येणारी बरीच मेडिकल उपकरणे ही पाकिस्तानातुन येतात. तसेच आपल्याकडे वापरण्यात येणारे चष्मे देखील मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून मागवले जातात.

४) पेट्रोलियम उत्पादन

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण पाकिस्तानातून पेट्रोलिअम उत्पादनं आणि तेल आयात केले जाते.

५) सिमेंट

मीठ,सल्फर, दगड , चुना आणि सिमेंट मोठ्या प्रमाणात भारतात विकले जाते . पण भारतातील काही लोकप्रिय सिमेंट पाकिस्तानी मध्ये बनवले जाते. जसे की बिनानी सिमेंट

६) चामडे – पाकिस्तानातून आयात केलेल्या चामडी वस्तुंना मोठी मागणी आहे.

७) कापूस – पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात कापूस आयात करण्यात येतो.

८) स्टील – पाकिस्तानातून लोखंड आणि स्टीलची आयात केली जाते.

९) तांबे – तांब्याच्या ज्या वस्तू आपण वापरतो त्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातून आयात केलेल्या असतात. तसेच कार्बनिक केमिकल्स आणि मेटल कंपाउंड देखील पाकिस्तानातुन मागवले जाते.

१० ) एंब्राडयरी आणि कॉटन फैब्रिक ब्रँड – हे ब्रॅंड्स काश्मीरमध्ये देखील सहज मिळतात. पाकिस्तानातील एंब्राडयरी आणि कॉटन फैब्रिक ब्रँड भारतात दिल्लीत आहेत. एव्हढेच नाही तर लाहोर मधील कुर्ते आणि पेशावर येथील चप्पल दिल्लीत मोठ्या प्रमाणात विकले जातात.

विशेष म्हणजे पाकिस्तानातील वस्तूंचा भारतात आयात २०१६ -१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये वाढले आहे. ४५५. ५ बिलियन डॉलर पासून वाढून २०१७ -१८ मध्ये ४८८. ५ मिलियन डॉलर झाला आहे.