आजपासून बँक, टॅक्स, विमा, वाहतूक क्षेत्रातील बदलले ‘हे’ 14 नियम, दैनंदिन जीवनावर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव टाकू शकतील असे काही नियम आज (१ सप्टेंबर) पासून लागू होत आहेत. त्यामुळे होत असलेले बदल जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपण जर का आयआरसीटीसी (IRCTC) च्या संकेतस्थळाचा वापर करून तिकीट बुक करत असाल तर त्यावर आपल्याला सेवा शुल्क द्यावा लागेल. बँकेतून एका वर्षभरात १ करोड पेक्षा जास्त रक्क्म काढली असल्यास २ टक्के टॅक्स लागणार आहे.

काही महत्वपूर्ण बदल
१. मोटार वाहन (दुरुस्ती ) विधेयक २०१९ लागू झाल्यामुळे १ सप्टेंबर पासून वाहतुकीचे काही नवीन नियम लागू होत आहेत. हे नियम तोडल्यास आपल्याला अगोदर पेक्षा आता जास्त दंड भरावा लागू शकतो. गाडी चालवताना फोन वर बोलणे, वाहन परवाना न बाळगणे, हेल्मेट न वापरणे अशा अनेक प्रकारच्या नियमांचे पालन न केल्यास अधिक दंड भरावा लागू शकतो.

२. जर आपण वित्तीय वर्ष २०१८-१९ साठी ३१ ऑगस्ट पर्यंत रिटर्न फाईल न केल्यास दंड भरून ३१ डिसेंबर पर्यंत रिटर्न फाईल करू शकतो. यादरम्यान रिटर्न फाईल केल्यास कायदेशीर कारवाई होण्यापासून वाचू शकता.

३. वाहनांचे भूकंप, दंगे, पुरासारखी नैसर्गिक आपत्ती, तोडफोड, अशा घटनांमध्ये वाहनांचे नुकसान झाल्यास त्यासाठी सामान्य विमा कंपन्या आता नवीन वेगळ्या प्रकारचे विमा कव्हर उपलब्ध करून देणार आहेत.

४. डिजिटल व्यवहारांना अधिक प्राध्यान्य मिळावे या हेतूने बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून १ करोड पेक्षा जास्त रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस काटला जाणार आहे.

५. आता १ सप्टेंबर पासून ऑनलाईन तिकीट बुक करणे महाग होणार आहे. स्लीपर क्लास साठी २० रुपये सेवा शुल्क एसी (AC ) क्लास साठी २० रुपये सेवा शुल्क , जर भीम अ‍ॅप्लिकेशन वापरून पेमेंट केल्यास स्लीपर क्लास साठी १० रुपये आणि एसी साठी २० आकारले जातील.

६. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या बँकिंग विभागाने सर्व सरकारी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांना सकाळी ९ वाजता उघडण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावातील तरतुदी आजपासून सर्व सरकारी बँकांना लागू होणार आहेत. त्यानुसार सर्व सरकारी बँका ज्या आधी १० वाजता सुरु होत होत्या त्या आता सकाळी ९ वाजता सुरु होणार आहेत.

७. १ सप्टेंबर पासून बँकांना जास्तीत जास्त १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जावे लागणार आहेत. याबाबतीत केंद्र सरकारने बँकांना मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.

८. आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) ने किरकोळ ठेवींवरील व्याज दर कमी केला आहे. १ लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ग्राहकांना बचत खात्यात ३.५ टक्के व्याज मिळणार आहे. तथापि, एक लाखाहून अधिक ठेवी असलेल्या ग्राहकांसाठी हा दर 3 टक्के असेल.

९. जर आपण एखादी संपत्ती खरेदी केली तर काही इतर सुविधा जसे की, कर पार्किंग, क्लब मेम्बरशिप , पाणी, लाईट अशा सुविधांसाठी येणारा खर्च टीडीएस च्या कक्षेत येणार आहे.

१०. ज्या लोकांनी अजूनही आपला आधार नंबर आपल्या पॅन कार्डला जोडला नसेल अशा लोकांना इनकम टॅक्स विभाग नवीन पॅन देणार आहे. बजेट मध्ये केलेल्या घोषणेनुसार जर एका विहित मुदतीत आपले आधार कार्ड पॅन कार्डला जोडले नाही तर ते अवैध मानले जाईल. अशा व्यक्तीसोबत पॅन कार्ड नसलेल्या व्यक्तीसारखा व्यवहार होईल.

११. आपल्याला मिळणारी लाईफ इन्शुरन्स मॅच्युरिटी ची रक्कम जर कर योग्य असेल तर आपल्या नेट उत्पन्नावर ५ टक्के टीडीएस कटेल. इन्शुरन्सच्या हप्त्यातून नेट उत्पन्नची रक्कम म्हणजे अशी रक्कम जी इन्शुरन्सचा हप्ता भरल्यानंतर शिल्लक राहते ती रक्कम होय.

१२. स्टेट बँकेसोबत काही दुसऱ्या बँकांचे कर्ज १ सप्टेंबर पासून रेपो रेट शी जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना कमी व्याज द्यावे लागेल. याव्यतिरिक सरकारी बँकेमधून ५९ मिनिटात ग्रह , ऑटो आणि व्यक्तिगत कर्ज मिळण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.

१३. तसेच स्टेट बँकेचे ऑटो आणि ग्रह कर्ज रेपो रेट शी जोडले जाणार आहे. एसबीआई ने गृह कर्जाचे व्याज दर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहे. १ सप्टेंबर पासून गृह कर्जावर ८.०५ टक्के व्याज असेल.

१४. १ सप्टेंबर पासून जर एखादा हिंदू व्यक्ती किंवा हिंदू अविभाजित कुटुंब काँट्रॅक्टर्स किंवा व्यवसायिकास एका वर्षात ५० लाखापेक्षा अधिक पेमेंट करत असेल तर त्यावर ५ टक्के टीडीएस कापला जाणार आहे.

अशा प्रकारचे बदल आजपासून (१सप्टेंबर ) पासून देशभरात लागू झाले आहेत. झालेले बदल आपणास माहित असल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

आरोग्यविषयक वृत्त –