कलम ३७० हटविण्याबाबत PM मोदी आणि HM शाह यांना सोडून केवळ ‘या’ व्यक्‍तींना होती माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यसभेत या प्रस्तावाला पाठींबा देण्यात आला असून आज लोकसभेत देखील यावर चर्चा होत असून लोकसभेत देखील या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अमित शहांच्या या घोषणेनंतर देशभरातून याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत देखील करण्यात आले. या नवीन निर्णयानुसार जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश होणार असून लडाख हा देखील नवीन केंद्रशासित प्रदेश होणार आहे.

या निर्णयापूर्वी पंधरा दिवस आगोदर भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधून अनेक पर्यटकांना देखील परत जाण्यास सांगितले होते. त्याचबरोबर काही गडबड होऊ नये यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. हा निर्णय घेताना मोदी सरकारने अत्यंत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्यात आली होती.त्यामुळे या निर्णयाची कुणकुण मंत्रिमंडळाला देखील लागली नव्हती. त्यामुळे संपूर्ण देशभरात आणि विरोधकांना देखील हा धक्का दिला होता. मात्र संपूर्ण देशभरातील जनतेने मोदींच्या या निर्णयाचे कौतुक करत अभिनंदन देखील केले. या निर्णयाची माहिती निवडक व्यक्तींसह बाहेरील फक्त दोन लोकानंच माहिती होते आणि त्या व्यक्ती म्हणजे ‘आरएसएस’ प्रमुख मोहन भागवत आणि त्यांचे सहकारी, महासचिव भैय्याजी जोशी या दोघांनाच हि माहिती देण्यात आली होती.

यामुळे दिली फक्त दोघांना कल्पना
१९५० पासून पक्षाच्या जाहीरनाम्यात हि दोन कलमे हटवण्याची मागणी केली जात होती. त्यामुळं आता जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिल्याने आम्ही हा योग्य निर्णय घेतल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आपल्या भाषणावेळी म्हटले. भाजप आणि आरएसएस या दोन्ही एकमेकांशी सलंग्न संस्था असल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी हा महत्वाचा निर्णय आरएसएस’ प्रमुख मोहन भागवत आणि त्यांचे सहकारी, महासचिव भैय्याजी जोशी या दोघांना दिली होती.

आरोग्यविषयक वृत्त –