खूपच कमी वयात आई बनल्या होत्या ‘या’ 4 ‘टॉप’च्या अभिनेत्री ! पहिली तर 16 व्या वर्षीच बनली होती 2 मुलांची ‘मम्मी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमध्ये अशााही काही अॅक्ट्रेस आहेत ज्यांनी खूप कमी वयात आई होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

1) उर्वशी ढोलकिया – एका रिपोर्टनुसार उर्वशीनं वयाच्या 15 व्या वर्षीच लग्न केलं होतं. वयाच्या सोळाव्या वर्षीच तिनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सागर आणि क्षितिज अशी त्यांची नावं आहेत. लग्नानंतर दीडच वर्षात ती पतीपासून वेगळं झाल्याचं सांगितलं जात आहे. नंतर तिनं स्वत:च मुलांचं पालन पोषण केलं.

2) डिंपल कपाडिया – एका वृत्तानुसार, एका सिनेमाच्या शुटींगदरम्यान डिंपल राजेश खन्नाच्या प्रेमात पडली होती. शुटींगनंतर त्यांनी लग्न केलं. त्यावेळी ती 16 वर्षांची होती. डिंपलनं वयाच्या 19 व्या वर्षी ट्विंकल खन्नाला जन्म दिला. डिंपल आणि राजेश यांच्यात 15 वर्षांचं अंतर होतं.

3) नीतू सिंग – दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव स्टोरी साऱ्यांनाच माहिती आहे. नीतूनं 22 व्या वर्षीच रिद्धीमा कपूर हिला जन्म दिला होता. रिद्धीमा रणबीर कपूरची मोठी बहिण आहे. एका टीव्ही कार्यक्रमात नीतू आणि ऋषी यांची भेट झाली होती.

4) भाग्यश्री – सलमान खानच्या मैने प्यार किया सिनेमातून भाग्यश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सिनेमानंतर तिनं हिमालय दसानीसोबत लग्न केलं. त्यावेळी ती अवघ्या 17 वर्षांची होती. लग्नच्या तीन वर्षांनीच म्हणजेच 20 व्यावर्षीची भाग्यश्री आई बनली होती.

अतिशय कमी वयात आई बनल्या होत्या ह्या 4 अभिनेत्री, पहिली तर 16 व्या वयातच बनली होती २ मुलांची आई …