राज्यातला सत्ता पेच सोडवण्यासाठी अमित शहांनी केली ‘या’ दोन दिग्गज नेत्यांची नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर येऊन पोहचला आहे. गेले अनेक दिवस शांत असणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राज्याच्या प्रकरणात सक्रीय झाले आहेत. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांनी 30 तारखेला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केले आहे. यावर आता दिल्लीहून लक्ष ठेवण्यात येणार आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा प्रश्न भाजपसाठी प्रतिष्ठेचा झाला असून कोणत्याही परिस्थीतमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.

अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्यांची नियुक्ती केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. भाजपची रणनीती यशस्वी करण्यासाठी आता नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची चिंता वाढणार आहे. आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातली सगळी सुत्र हलवत होती. नितीन गडकरी यांचे शिवसेनेसोबत आणि राष्ट्रवादीसोबत चांगले संबध आहेत. त्यामुळे भाजप याचा फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

भाजपने ज्यांच्यावर ही जबाबदारी टाकली ते सर्व नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. हे दिग्गज नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते आणि नारायण राणे या चारही नेत्यांचं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी आणि नेत्यांशी चांगली ओळख आहे. त्याचबरोबर त्यांना संसदीय राजकारणाचाही दिर्घकाळ अनुभव आहे. त्यामुळे भाजपने ही जबाबदारी त्यांना सोपविल्याचं मानलं जातंय.

Visit : Policenama.com