Life Tips : मनुष्याच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 4 उपाय देतील तुम्हाला स्ट्रेस फ्री आणि पॉझिटिव्ह लाइफ

पोलिसनामा ऑनलाइन – आपण या सणाच्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मनसोक्त गोडधोड पदार्थांवर ताव मारतो. पण असे करणे स्वाभाविक आहे, भारतीय असल्याचा हा सर्वात मोठ फायदा आहे की, देशात आपल्याला असंख्य प्रकारच्या पदार्थांचा आनंद घेण्याची संधी मिळते. मग जेव्हा सण आता थोडे थांबले आहे तर आपल्या आरोग्याकडे थोडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी काही उपाय केल्यास तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट होऊ शकता.

हे आहेत ते उपाय

1 पाणी
सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्या. किंवा दिवसात जेव्हा मनाला वाटेल तेव्हा पाणी प्या. डिटॉक्स वॉटरसाठी काकडी पाण्यात टाकून घ्या, त्यामध्ये लिंबूचा रस आणि पुदीन्याची पाने मिसळा. यामुळे ब्लोटिंग ज्यामुळे गॅस बनतो ती समस्या दूर होईल.

2 झोप
कमीत कमी सहा ते सात तासांची चांगली झोप आवश्यक आहे. झोप न मिळाल्यास स्मरणशक्ती कमी होते, थकवा येतो, एकाग्रता कमी होते. यासाठी भरपूर झोप घ्या.

3 लिखाण जरूरी
नवीन टेक्नॉलॉजीमुळे पेन आणि कागद दुर्मिळ होत चालला आहे. परंतु कागदावर आपले विचार मांडल्याने फायदे होतात. यामुळे स्मरणशक्ती वाढते, हाताचे मसल्ससुद्धा अ‍ॅक्टिव्ह होतात.

4 चालत रहा
दिनचर्येत चालण्याला महत्व दिले पाहिजे. रोज अर्धातास तरी चाला. यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, मनोदशा सुधारते, इम्युनिटी वाढते, पचनक्रिया सुधारते, डायबिटीजचा धोका कमी होतो. स्मरणशक्ती वाढते.