लग्नाशिवाय आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहतात ‘या’ 5 अभिनेत्री, काहींनी दिलाय मुलाला ‘जन्म’ !

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – लग्नाशिवाय प्रियकरासोबत राहणे आपल्या समजत योग्य मानले जात नाही. मात्र सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी ही एक साधी गोष्ट आहे. कारण सिनेसृष्टीमधे असे अनेक कलाकार आहेत जे लग्नाशिवाय एक मेकांसोबत राहतात. जाणून घेऊयात अशा काही अभिनेत्रीणबाबत ज्या लग्नाशिवाय कलाकारांसोबत राहतात.

Related image

1) एमी जॅक्सन
एमी जॅक्सन अनेक दिवसांपासून जॉर्ज पानायिटू सोबत रिलेशनमध्ये आहे आणि त्यांनी अजून लग्न देखील केलेले नाही. दोघांची रोमँटिक केमेस्ट्री अनेक वेळा सोशल मीडियावर पहायला मिळालेली आहे. विशेष म्हणजे एमी जॅक्सनने 23 सप्टेंबर 2019 ला एका मुलाला जन्म दिला. एंड्रियास असे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले आहे.

Image result for गैब्रिएला hot

2) गैब्रिएला
गैब्रिएला ही साऊथ आफ्रिकेची एक सुंदर मॉडेल आणि अभिनेत्री आहे. त्यांचे रिलेशन अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या सोबत आहे. अनेक वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. गैब्रिएलाने 18 जुलै 2019 रोजी एका मुलाला जन्म दिला आहे.

Related image

3) माही गिल
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माही गिल ही देखील गोव्याच्या एका व्यवसायिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यांना एक मुलगी देखील आहे. माही तिच्या मुलीसोबत मुंबईला राहते आणि अधूनमधून गोव्याला जात असते.

Related image

4) सुष्मिता सेन
सुष्मिता सेन सध्या आपला बॉयफ्रेंड रोमन शॉल मुळे चांगलीच चर्चेत आलेली आहे. विशेष म्हणजे सुष्मिताने अजून विवाह केलेला नाही. परंत्तू असे सांगितले जाते की सुष्मिता आपल्या बॉयफ्रेंड सोबत बांद्राला एकाच घरामध्ये राहते.

Related image

5) मुग्धा गोडसे
मुग्धा गोडसे मोठ्या कालावधीपासून बॉलीवूड पासून दूर आहे परंतु आपल्या खाजगी आयुष्यामुळे मुग्धा गोडसे अजूनही चर्चेत असते. मिळालेल्या माहितीनुसार मुग्धा स्वतःहून अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या बॉलीवूड अभिनेता राहुल देवला डेट करत आहे आणि दोघेही अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

फेसबुक पेज लाईक करा