लग्नासाठी पालकांना ‘राजी’ करायचंय तर जरूर पाहा ‘हे’ 5 सिनेमे, काम नाही झालं तर सांगा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतातील बर्‍याच पालकांसाठी प्रेम विवाह हा अजूनही एक भयानक विचार आहे. त्यांना असे लग्न योग्य वाटत नाही, ज्यात प्रेम कोणत्याही बंधनांपूर्वी असेल. ते अजूनही लग्नासाठी जोडीदार निवडण्याच्या पारंपारिक पद्धतीवरच विश्वास ठेवतात. मात्र ही गोष्ट वेगळी आहे की अजूनही बरेच लोक आपल्या पालकांच्या निवडीने आपला जोडीदार निवडण्यास प्राधान्य देतात. परंतु सर्वात मोठी अडचण प्रेमाच्या जादूमध्ये हरवलेल्या प्रेमळ जोडप्यांची आहे.

आपल्या सर्वांना हे माहित आहे की, प्रेमविवाहासाठी चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या अडचणींपेक्षा खऱ्या आयुष्यात आणखी खूप अडचणी असतात. हे यामुळेही आहे कारण आपल्या समाजात आपल्या पसंतीच्या मुलीशी किंवा मुलाशी लग्न करणे थोडे चुकीचे मानले जाते. हेच कारण आहे की जेव्हा प्रेम विवाहाचा उल्लेख होतो, तेव्हा जात-धर्म, लिंग आणि समाज आणि बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागते. मात्र अगदी थोड्या जोडप्यांना हे माहिती असेल की, जर तयारी पूर्ण झाली असेल तर आपल्या पालकांनाही प्रेम विवाहासाठी पटवले जाऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हीही त्या लवबर्ड्सपैकी एक असाल, ज्यांच्या लाखो प्रयत्नांनंतरही त्यांचे पालक लग्न करण्यास तयार नसतील, तर सर्वप्रथम त्यांना हे चित्रपट दाखवा…

चित्रपटांच्या कॉन्सेप्टचे कारण

जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या प्रियजनांना मनातील भावना सांगायच्या असतात, तेव्हा आपण लगेच एक रोमँटिक गाणे त्यांना पाठवतो. त्याच वेळी पालकांना देखील हा नियम लागू करा. जर तुम्हाला खरोखर तुमच्या जोडीदाराबरोबर लग्न करायचे असेल, तर सर्वप्रथम पालकांना असे काही चित्रपट दाखवा, ज्यामुळे त्यांना तुमच्या मनात असलेली भावना सहजपणे समजेल. याचा पहिला फायदा म्हणजे त्यांना काही न बोलता तुम्ही बर्‍याच गोष्टी समजावून सांगू शकता आणि दुसरे म्हणजे कदाचित प्रेम विवाहाबद्दल त्यांचे अनेक गैरसमज देखील दूर होऊ शकतात.

2 स्टेट्स

आंतरराज्य किंवा आंतरिक सांस्कृतिक विवाहासाठी कदाचित यापेक्षा एखादा चांगला चित्रपट बनला असेल. ‘2 स्टेट्स’ चित्रपटामध्ये अशा दोन लोकांची कथा दाखवली गेली आहे, ज्यांनी केवळ एकमेकांची संस्कृतीच स्वीकारली नाही, तर एकमेकांच्या पालकांचे मन जिंकण्यासाठीही खूप प्रयत्न केले.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे

प्रेम विवाहाविरोधात असलेल्या पालकांच्या मुलांनी हा चित्रपट एकत्र बसून नक्की पाहिला पाहिजे. कदाचित हा चित्रपट पाहून तुमच्या पालकांना हे समजेल की, लग्नासारख्या मोठ्या निर्णयामध्ये मुलांची मान्यता देखील खूप महत्त्वाची असते.

बेवकूफीयां

या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि सोनम कपूर एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण सोनमचे वडील म्हणजेच ऋषी कपूर यांना या नात्यावर आक्षेप असतो. पण आयुष्यमानचे आपल्या सासऱ्याला पटवण्याच्या मार्गांमुळे शेवटी ते तयार होतात.

आकाशवाणी

‘आकाशवाणी’ हा चित्रपट केवळ अशा जोडप्यांसाठी आहे, जे आपल्या पालकांमुळे एकमेकांशी लग्न करू शकत नाही. या चित्रपाटात हे खूप चांगल्या प्रकारे दाखवले गेले आहे की, एका अशा व्यक्तीसोबत लग्न करून राहणे किती अवघड आहे, ज्याच्यावर तुमचे प्रेमच नसेल.