‘या’ 5 सवयी आत्मसात करून महिला 14 वर्षांपर्यंत वाढवू शकतात स्वतःचं वय, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – प्रत्येकाला एक चांगले आणि निरोगी जीवन हवे असते. परंतु, अनेकदा बेजबाबदारपणामुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात. मात्र, काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊन तुम्ही तुमचे वय आणखी वाढवू शकता. याअंतर्गत महिला आपल्या डेली रूटीनमध्ये काही बदल करून आपले वय चौदा वर्षांपर्यंत वाढवू शकतात. ही बाब एका संशोधनातून समोर आली आहे.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 5 अशा सवयी सांगितल्या आहेत, ज्या जीवनाच्या भाग बनवल्यास जीवन सुमारे 10 वर्षापर्यंत वाढू शकते.

संशोधकांचे म्हणणे आहे की, आपल्या जीवनशैलीत काही बदल करून महिला आपले जीवन 14 वर्षांपर्यंत वाढवू शकतात, तर पुरूषांचे जीवन 12 वर्षांपर्यंत वाढू शकते. यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या आहेत त्या सवयी

1 आहाराचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम पडतो, यासाठी आहारात जास्तीत जास्त हेल्दी पदार्थांचा समावेश करा.

2 शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट रहाण्यासाठी एक्सरसाईज खुप जरूरी आहे. यासाठी नियमित व्यायाम करा.

3 फिट राहाण्यासाठी वजन नियंत्रित ठेवले पाहिजे.

4 कमी कॅलरीजचे पदार्थांचे सेवन करा.

5 जर तुम्ही स्मोकिंग आणि दारू पित असाल तर त्यापासून दूर राहा. यामुळे एक दिर्घ आणि निरोगी जीवन मिळवू शकता.