Blood Pressure : ब्लड प्रेशरच्या बाबतीत ठेवू नका ‘हे’ 5 गैरसमज, ठरू शकतात धोकादायक

पोलिसनामा ऑनलाइन – शरीर निरोगी राहण्यासाठी ब्लड प्रेशर योग्य राहाणे खुप जरूरी आहे. ब्लड प्रेशरमध्ये चढ-उतार शरीरात होत असलेल्या बदलाचे संकेत देतात. ब्लड प्रेशरचे वाढणे आणि कमी होणे दोन्ही हानिकारक ठरू शकते. ब्लड प्रेशर वाढल्याने हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. तर, ब्लड प्रेशर कमी झाल्याने चक्कर येऊ लागते.

ब्लड प्रेशरबाबत लोकांमध्ये अनेक प्रकारचे भ्रम आहेत आणि माहिती नसल्याने लोक ब्लड प्रेशर योग्य राखण्यासाठी योग्य पाऊल उचलू शकत नाहीत. ब्लड प्रेशर बाबत सामान्यपणे कोणते गैरसमज असतात, जे महागात पडू शकतात, ते जाणून घेवूयात.

समज-1. ब्लड प्रेशरमध्ये चढ-उतार झाल्याने कोणतेही नुकसान होत नाही.

– हाय ब्लड प्रेशर काही गंभीर संकेत सुद्धा देतो. तर ब्लड प्रेशर कमी झाल्याने सुद्धा शरीर योग्य प्रकारे काम करत नाही. नियमित ब्लड प्रेशर तपासले पाहिजे. जर सतत ब्लड प्रेशरमध्ये बदल दिसत असेल तर डॉक्टरांशी संपर्क करून उपचार करा.

समज 2. हाय ब्लड प्रेशरला कंट्रोल करता येऊ शकत नाही.

– हा गैरसमज आहे. हाय ब्लड प्रेशर निरोगी आहार, योग्य जीवनशैली आणि औषधांद्वारे नियंत्रणात ठेवता येते. रोज एक्सरसाइज करणे, वजन योग्य ठेवणे, हेल्दी डाएट, तणाव न घेणे आणि धुम्रपान सोडल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहू शकतो.

समज 3. मीठ कमी केल्याने हाय ब्लड प्रेशर ठिक होते.

– गरजेपेक्षा जास्त मीठ ब्लड प्रेशर आणि किडनी दोन्हीसाठी खराब आहे. मीठ कमी केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते, परंतु जर तुम्हाला वाटत असेल केवळ मीठ कमी करण्याने हायपरटेंशन कमी होईल, तर हे चुकीचे आहे. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली सुद्धा आवश्यक आहे.

समज 4. ब्लड प्रेशर नियंत्रित झाल्यानंतर उपचार बंद करणे.

-हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या कंट्रोल झाल्यानंतर सामान्यपणे लोक उपचार बंद करतात. हे चुकीचे आहे. जोपर्यंत डॉक्टर हा सल्ला देत नाहीत तोपर्यंत औषध सुरू ठेवा.

समज 5. ब्लड प्रेशर कमी झाल्यावर कॉफी प्यावी.

– सामान्यपणे लोकांना वाटते की, ब्लड प्रेशर कमी झाल्यास कॉफी पिण्याने ब्लड प्रेशर योग्य होते. कॉफीत आढळणारे कॅफीन केवळ काही वेळासाठी स्थिती कंट्रोल करू शकते, कारण हा ब्लड प्रेशरचा उपचार नाही. कॅफीनचा खुप वापर शरीरासाठी हानिकारक आहे. हाय ब्लड प्रेशरची तक्रार असेल तर जास्त कॅफीन टाळावे.