Budget 2020 : अर्थमंत्र्यांकडे नाही तर ‘या’ 5 लोकांकडे असते ‘अर्थसंकल्पाचे’ संपूर्ण ‘काम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत असताना पुन्हा सत्तेत आलेले मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पाहिला अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची याकडे खास लक्ष आहे. यासाठी पंतप्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी तज्ज्ञासह बैठका घेतल्या आहेत ज्याने मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देता येईल. संसदेत तर अर्थमंत्रीच अर्थसंकल्प सादर करतील परंतु त्यामागे अनेक लोकांची मेहनत असेल. हे पाच लोक जे अर्थसंकल्प तयार करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात.

 –
राजीव कुमार वित्त मंत्रालयाचे टॉप अधिकारी आहेत जे बँकिंग रिफॉर्म्ससाठी ओळखले जातात. बँकांच्या विलनीकरणपासून ते बँकांच्या नोंदणीपर्यंत त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे जेणेकरुन सरकार बँकांच्या कर्जातून मुक्त होईल. अपेक्षा आहे की बँकिंग सेक्टरमधील संकट दूर करण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका असेल.

आर्थिक प्रकरणांचे सचिव, अतनु चक्रवर्ती –
अतनु चक्रवर्ती सरकारी संपत्तीच्या विक्रीसाठी ओळखले जातात. त्यांनी मागील वर्षीच जुलैमध्ये आर्थिक विभागाचा कार्यभार संभाळला. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था 5 टक्क्यांपेक्षा कमी होत होती तेव्हा त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 1 लाख कोटी रुपये गुंतवण्याचा प्लॅन तयार केला. असे सांगितले जात आहे की सरकारचा हा प्लॅन अर्थव्यवस्थेला गती देण्यास फायदेशीर ठरेल. देशाच्या राजकोषीय तूट संतुलित करण्यात त्यांची खास भूमिका राहिली आहे.

व्यय सचिव, टी. व्ही. सोमनाथन –
अर्थमंत्रालयात सर्वात शेवटी येतात ते टी व्ही सोमनाथन, याचे काम सरकारी खर्चाची देखभाल करणे. त्यांच्या देखरेखीत सरकारी खर्चांचे व्यवस्थापन करणे, बाजारातील मागणी वाढवणे आणि आवश्यक नसलेल्या खर्च कमी करणे अशी कामे होतात. याआधी सोमनाथन पंतप्रधान कार्यालयात काम करत होते. त्यामुळे अपेक्षा बाळगली जात आहे की सोमनाथन यांना याची जास्त माहिती असेल की पंतप्रधान मोदींना कशा प्रकारचा अर्थसंकल्प हवा आहे.

राजस्व सचिव, अजय भूषण पांडेय –
सध्या अर्थमंत्रालयात ज्या सचिवावर जास्त दबाव आहे तो म्हणजे अजय भूषण पांडेय आहेत. पांडेय यांच्यावर रिसोर्सेज संभाण्याचा बोझ्यात आहे. एक वेळ अशी होती जेव्हा टॅक्स रेवेन्यू निश्चित लक्षापेक्षा कमी होता आणि आर्थिक मंदी होती. 1.45 लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स कपातीनंतर आता गुंतवणूक येणं बाकी आहे. त्यामुळे पांडेय यांना या अर्थसंकल्पात असा काही मार्ग काढावा लागेल, ज्याने सरकारला जास्त महसूल जमा होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल.

निर्गुंतवणूक सचिव, तुहीन कांत पांडेय –
तुहीन कांत पांडेय यांची जबाबदारी एअर इंडिया लिमिटेडच्या निर्गुतंवणूकीसंबंधित आहे. यावेळी केंद्र सरकार मागील वर्षी जुलैमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या निर्धारित 1.05 लाख कोटी रुपयांच्या आपल्या निर्गुंतवणूकीच्या लक्षापासून दूर आहेत. त्यामुळे पुढील वर्षासाठी निर्गुंतवणूकीबाबत त्यांच्यापुढे मोठे लक्ष असणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like