1 डिसेंबरपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, ATM मधून पैसे काढणे आणि ट्रान्सफर करणे आणखी होणार सोपे

नवी दिल्ली : 1 डिसेंबर 2020 पासून सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधीत अनेक गोष्टीत बदल होणार आहेत. यामध्ये आरटीजीएस, रेल्वे आणि गॅस सिलेंडरशी संबंधीत अनेक गोष्टी बदलतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर पडणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने रियल टाइम ग्रोस सेटलमेंट (आरटीजीएस) बाबतच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा नियम कॅश ट्रान्सफरशी संबंधीत आहे. याशिवाय सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे रेट अपडेट करतात. जाणून घ्या हे नियम –

1. आरटीजीएस सुविधेचा फायदा
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरपासून तुमच्या बँकेच्या व्यवहारांशी संबंधीत नियमात काही बदल होणार आहेत. आरबीआयने आरटीजीएस 24 बाय 7 बाय 365 उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. म्हणजेच आपण आता आरटीजीएसच्या माध्यमातून चोवीस तास पैसे ट्रान्सफर करू शकाल. सध्या आरटीजीएस सिस्टम महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सोडून आठवड्याच्या सर्व कामाजाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असते.

2. पीएनबी एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले
एक डिसेंबरपासून पीएनबी 2.0 (पीएनबी, ईओबीसी, ईयूएनआय) वन टाइम पासवर्ड (ओटीपी) बेस्ड कॅश विदड्रॉअल सुविधा लागू करत आहे. 1 डिसेंबरपासून रात्री 8 वाजतापासून सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पीएनबी 2.0 एटीएममधून एकावेळी 10000 रुपयांपेक्षा कॅश काढणे आता ओटीपी बेस्ड असेल. म्हणजे या रात्रीच्या वेळात 10000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी पीएनबी ग्राहकांना ओटीपीची आवश्यकता असेल. यासाठी ग्राहकांना आपला मोबाइल सोबत ठेवावा लागणार आहे.

3. प्रीमियममध्ये करू शकता बदल
आता 5 वर्षानंतर वीमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्केपर्यंत कमी करू शकतात. म्हणजे ते अर्ध्या रक्कमेसह सुद्धा पॉलिसी सुरू ठेवू शकतील.

4. 1 डिसेंबरपासून नवीन ट्रेन
इंडियन रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन ट्रेन चालवणार आहे. कोरोना संकटानंतर रेल्वे सतत नवीन ट्रेन सुरू करत आहे. आता 1 डिसेंबरपासून सुद्धा नवीन ट्रेनचे संचलन सुरू होणार आहे. यामध्ये झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेलचा समावेश आहे. दोन्ही ट्रेन सामान्य श्रेणीत चालवल्या जातील. 01077/78 पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई फिरोजपुर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.

5. बदलतील स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार स्वयंपाकाच्या गॅसच्या म्हणजेच एलपीजी सिलेंडरच्या दराचे पुनरावलोकन करते. म्हणजे 1 डिसेंबरला सुद्धा देशभरात स्वयंपाकाच्या गॅसचे दर बदलतील. मागील महिन्यात या दरात कोणतेही बदल झाले नव्हते.