महिलांनो ‘या’ समस्या आढळल्यास दुर्लक्ष करू नका

पोलिसनामा ऑनलाइन टीम – महिला आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत नसल्याने महिलांनमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या दिसून येतात. संपूर्ण घराजी काळजी घेता घेता महिला स्व:ताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. याच समस्या नंतर अधिक गंभीर होतात. त्यामुळेच वेळीच अशा समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. काही आजारांचे संकेत शरीर देत असते. हे संकेत, लक्षणे ओळखून महिलांनी तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे.

महिलांना शरीरात काही जाणवत असतील, तर त्याचे कारण जाणून घ्यायला हवे. काही लक्षणे अशी असतात ज्यांचे रूपांतर नंतर मोठ्या आजारात होऊ शकते. ही लक्षणे कोणती याविषयी माहिती घेवूयात. पहिले लक्षण आहे, पाठिच्या खालच्या भागामध्ये आणि पायांमध्ये वेदना होणे. मासिक पाळीदरम्यान पाठिच्या खालच्या भागामध्ये आणि पायांमध्ये वेदना होणे सामान्य असू शकते. परंतु त्याआधी किंवा त्यानंतरही असे होणे सामान्य नाही. त्यामुळे असा त्रास होत असल्यास एंडोमेट्रियोसिसचा धोका होऊ शकतो. यामुळे दुर्लक्ष न करता सरळ डॉक्टरांची भेट घ्या.

दुसरे लक्षण आहे मासिक पाळी दरम्यान लाल किंवा ब्राउन रंगाचे गोठलेले रक्त येणे. मासिक पाळीदरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लीडिंगचा सामना करावा लागतो. कमी, जास्त प्रमाणात हे ब्लीडिंग होते. तसेच हलक्या लाल रंगाचं अथवा गडद लाल रंगाचं ब्लीडिंग होते. पण मासिक पाळी दरम्यान जर गोठलेले रक्त येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. हे संकेत यूटड्ढसमध्ये फायब्रॉएड आहे. हा गर्भाशयामध्ये होणारा एक ट्यूमर आहे. ज्याचा आकार हळूहळू वाढतो यामुळे अनियमित मासिक पाळी आणि ब्लीडिंगशिवाय वंधत्वाचा धोकाही वाढतो.

तिसरे लक्षण आहे जास्त गरम होणे किंवा थंडी वाजणे होय. जास्त गरम होत असेल किंवा थंडी वाजण्याचे कारण एस्ट्रोजनची पातळी असू शकते. हे एक प्रकारचे हार्मोन असते. एस्ट्रोजन हार्मोनची भूमिका महिलांमध्ये अधिक असते. तसेच केस गळणे हेदेखील दखल घेण्याजोगे लक्षण आहे. अनेकदा केस गळण्याच्या समस्येकडे महिला दुर्लक्ष करतात. केस जास्त गळत असतील तर ते आरोग्यासाठी घातक ठरते. कारण केस निरोगी ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरोन महिलांच्या ओवरीमध्ये फार कमी प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे असंतुलित झाल्यामुळे वजन वाढते, चेहरा आणि इतर अवयवांवर केस येणे यांसारख्या समस्या वाढतात. पोट फुगणे हे लक्षण देखील गंभीर आहे.

अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान पोट फुगण्याच्या समस्येचा त्रास होतो. ही समस्या दर आठवड्याला होत असेल तर हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. कारण हे एंडोमेट्रियोसिस असू शकते. यामध्ये पोट फुगल्यासारखं वाटतं आणि एंडोमेट्रियोसिस ऊतक तुटून जातात. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवरही होतो आणि गरभधारणेमध्येही समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त सतत सूज येणं, पोटाचा ट्यूमर, हर्निया, लिव्हर इन्फेक्शन, ओव्हरियन कॅन्सर किंवा यूट्रस कॅन्सरही होऊ शकतो. त्यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे आढल्यास दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like