Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : यकृतातील चरबीचा आजार (Fatty liver disease) ही लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे होणारी एक कॉमन कंडीशन आहे. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा लिव्हरसंबंधित रोगाचा एक मुख्य प्रकार आहे. लिव्हरमध्ये वाढलेली चरबी मानवी आरोग्यासाठी खूप धोकादायक असू शकते. तज्ञांच्या मते, NAFLD चे बरेच वेगवेगळे टप्पे असतात आणि प्रत्येक टप्प्याचे काही लक्षणे (Fatty liver disease warning sign) देखील असतात.

या लक्षणांनी होते आजाराची ओळख

लॉन्ग-टर्म लिव्हर डॅमेजमुळे लोकांमध्ये लिव्हर सिरोसिसचा धोका वाढू शकतो. जर सिरोसिस आपल्या अ‍ॅडव्हान्स स्टेजवर पोहोचला तर त्याचे अनेक गंभीर लक्षणे पाहायला मिळू शकतात. ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ नुसार पाय, टाच किंवा पंजा मध्ये तीव्र सूज येणे ही त्याची लक्षणे असू शकतात.

हे देखील आहेत चेतावणी देणारी चिन्हे

तज्ञांनी सिरोसिसची आणखी बरीच लक्षणे सांगितली आहेत, ज्याकडे पाहून आपण या आजाराची कल्पना लावू शकता. त्वचेचे पिवळे होणे, डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर होणे किंवा त्वचेला खाज सुटणे हे देखील त्याची चेतावणी देणारी चिन्हे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

NAFLD चा उपचार कसा करावा?

डॉक्टर म्हणतात की NAFLD साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. तथापि, जीवनशैलीत लहान-सहान बदल करून ते खराब होण्यापासून रोखले जाऊ शकते. यामध्ये वजन कमी करणे हे सर्वात फायदेशीर ठरते. यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेली चरबी आणि फायब्रोसिसला कमी करता येऊ शकते.

शॉर्टकट पद्धतीने वजन कमी करू नका

आरोग्य तज्ञ म्हणतात की शॉर्टकट पद्धतीने वजन कमी करणे धोकादायक ठरू शकते. याचा तुमच्या लिव्हरवर फार वाईट परिणाम होऊ शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य वर्कआउटद्वारे वजन कमी करूनच NAFLD ला टारगेट केले जाऊ शकते.

विशिष्ट व्यायामावर करा फोकस

ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार प्रतिरोध व्यायाम शरीराचे वजन कमी करून NAFLD च्या समस्येपासून आराम देतो. या व्यायामापासून NAFLD चा धोका कमी करण्यासाठीच्या दाव्यावर अजून संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

अल्कोहोलपासून धोका

जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्यासाठी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला लक्षात ठेवा. आपण नियमितपणे मद्यपान करत असाल तर हे लक्षात घ्या की डॉक्टर आठवड्यात 14 युनिटपेक्षा जास्त मद्यपान करण्यास नकार देतात. आठवड्यात तीन वेगवेगळ्या दिवसांमध्ये हे युनिट घेण्याचा प्रयत्न करा.

आपला आहार कसा ठेवावा

डॉक्टर म्हणतात की NAFLD टाळण्यासाठी आपण निरोगी आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या आहारात धान्याचे प्रमाण वाढवा जे फायबर आणि कर्बोदकांनी समृद्ध असते. तसेच साखरेचे जास्त सेवन करणे देखील टाळा.