उद्यापासून ‘या’ ५ गोष्टींमध्ये होणार मोठे बदल ; थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार ‘प्रभाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ जूनपासून बँकिंग, पेट्रोल, घरगुती गॅस, यांसारख्या गोष्टींमध्ये बदल होणार असून त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. यामध्ये आरबीआयकडून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठीचे नियम बदलणार आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅससाठी नवीन किमती लागू होणार आहेत. तर व्याजदराविषयी निर्णय घेण्यासाठी आरबीआयची क्रेडिट पॉलिसी सुरु होणार आहे.

१) घरगुती गॅसच्या किमतीत होऊ शकते वाढ –

१ जूनपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे. यापूर्वी १ मे रोजी एलपीजीची किंमत वाढविण्यात आली होती. तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्यात एलपीजी सिलेंडरची किंमत २८पैशांनी वाढविली होती. तर विना अनुदानधारक सिलेंडरची किंमत ६ रुपयांनी वाढविण्यात आली होती.

२ ) EMI घटणार –

आरबीआयकडून व्याजदरांमध्ये कपात करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या द्वै-मासिक धोरणाची घोषणा ६ जून २०१९ रोजी जाहीर केली जाईल. व्याजदर घटले तर तुमच्या खिशावरील ताण कमी होईल.

३) पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ‘RBI’ ने नियम बदलले –

RTGS द्वारे पैसे दुसऱ्या खात्यात जमा करण्याच्या वेळेमध्ये १ जूनपासून बदल करण्यात येणार आहे. RBI ने आरटीजीएसद्वारे पैसे दुसऱ्या खात्यात जमा करण्याची वेळ दीड तासांनी वाढवली आहे. पूर्वी केवळ ४ पर्यंतच आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर करता येत होते. आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही सुविधा चालू राहणार आहे.

४) आर्मी कँटीनमधून कार खरेदी महागली –

तुम्ही जर आपण कॅंटीनमधून कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर १ जूनपासून तुम्हाला अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. असे असताना मात्र वाहनांच्या CSD कॅंटीन किंमती कमी करण्यासाठी नवीन नियम प्रस्ताव पाठविण्यांत आला आहे.

५) हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही-

विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल दिलं जाणार नाही. मात्र हा नियम केवळ उत्तर प्रदेशच्या नोएडा और ग्रेटर नोएडा भागासाठी असेल. रस्ते सुरक्षेसंबंधी नागरिकांमध्ये जागरुकता आणण्याच्या उद्देशाने, हेल्मेटविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा नवा नियम लागू होणार आहे.