‘हे’ 6 दिग्दर्शक आहेत तब्बल इतक्या कोटींचे मालक; वाचून व्हाल हैराण

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतात असे काही दिग्दर्शक आहेत ज्यांनी आजवर अनेक सुपरहीट चित्रपट दिले. त्या चित्रपटाचे यश किंवा अपयश यात चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा सगळ्यात मोठा वाटा असतो. पण एका चित्रपटामागे ते किती फी घेतात हे माहीत आहे का? चला जाणून घेऊ ते दिग्दर्शक…

एस एस राजामौली –  ‘बाहूबली’ सारखा सुपरहीट चित्रपट बनवणारे एस एस राजामौली हे भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारे दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. बाहूबली चित्रपटासाठी त्यांनी १०० करोडचा शेअर घेतला होता. ज्याने ते सगळ्यात जास्त मानधन घेणारे ठरले होते.

रोहीत शेट्टी –  बॉलिवूड चा लोकप्रिय दिग्दर्शक रोहीत शेट्टीने आजवर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. एका चित्रपटासाठी तो २८ ते ३० करोड रुपये घेतो. बॉलिवूडचा सगळ्यात जास्त मानधन घेणारा दिग्दर्शक म्हणून देखिल त्याची ओळख आहे.

ए. आर. मुरुगादास –  ‘गजनी’, ‘अकिरा’, ‘होलीडे’ यांसारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादास हे एका चित्रपचासाठी १६ कोटी रुपये घेतात.

राजकुमार हिराणी –  ‘मुन्नाभाई MBBS’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘थ्री इडीयट्स’, ‘पीके’, ‘संजू’ असे सुपरहीट चित्रपट देणारे राजकुमार हिराणी एका चित्रपटासाठी १४ ते १५ करोड रुपये फी घेतात.

करण जोहर –  दिग्दर्शक करण जोहरची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. एका वृत्तानुसार करण एका चित्रपटासाठी १४ ते १५ करोड रुपये घेतो.

मनिरत्नम –  साऊथ तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक मनिरत्नम एका चित्रपटासाठी ९ कोटी रुपये घेतात.