Knee Injury : गुडघ्यांना खुपच त्रासदायक ठरू शकतात ‘या’ 6 चूका, ‘या’ अ‍ॅथलीटने परिणाम भोगलेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : 27 वर्षांची स्केटिंग खेळाडू राशेल पिप्लिका हिच्या गुडघ्यातून एक दिवस खेळताना अचानक आवाज आला आणि गुडघा साईडने दुमडल्यासारखे वाटू लागले. यावेळी तिला भयंकर वेदना होत होत्या. डॉक्टरांनी तिला सांगितले की पुन्हा जर उडी मारली तर गुडघा गमावू शकतेस. तिच्या गुडघ्याला एसीएल इंज्युरी (एंटीरियर क्रूशिएट लिगामेंट) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुखण्याचे काही संकेत तिला स्केटिंगच्या मागील सीझनमध्ये सुद्धा जाणवले होते. पण तिने दुर्लक्ष केले होते.

युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हेनियाची ऑर्थोपेडिक सर्जन आणि स्पोर्र्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट निकोलस डिनुबाइलनुसार, गुडघ्याचे लिगामेंट फाटू शकतात. याच्या टेंडन्समध्ये सूज येऊ शकते. ऑस्टियोआर्थरायटिस होऊ शकतो. आपले गुडघे वाचवण्यासाठी सहा गोष्टींकडे लक्ष देणे खुप आवश्यक आहे.

गुडघ्यातील वेदना
हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जन (न्यूयॉर्क) चे एमडी आणि स्पोर्र्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट जॉर्डन मॅजल म्हणतात, गुडघ्यात वेदना होत असतील, तर तिकडे कधीही दुर्लक्ष करू नका. शरीर संकेत देत असते.

ओव्हरवेट
लठ्ठपणामुळे सुद्धा गुडघ्यांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका वाढतो. यासाठी वेळीच एक्सरसाइज सुरू करा. वाढलेले एक पौंड वजन सुद्धा गुडघ्यांवर पाच पौंडचा भार टाकते.

दुखापतीनंतर जास्त लक्ष द्या
गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर रेस्ट आणि रिहेबिलेटेशन पीरियड भविष्यात वेदना किंवा रिइंज्युरीपासून वाचण्यासाठी महत्वपूर्ण असतो.

एसीएलकडे दुर्लक्ष नको
एसीएल गुडघ्यांमध्ये होणारी सर्वात कॉमन इंज्युरी आहे. खेळाडूंना याचा धोका जास्त असतो. याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांकडे जा.

एक्सरसाइजच्या वेळी लक्ष ठेवा
जास्त एक्सरसाइजमुळे ताण येऊ शकतो. यासाठी वर्कआऊटनंतर आणि अगोदर स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. हार्ड वर्कसह हलकी एक्सरसाइजसुद्धा करा.

मांसपेशींसाठी एक्सरसाइज
कमजोर मांसपेशी आणि त्यामध्ये फ्लेक्सिबिलिटीच्या कमतरता गुडघ्याच्या इंज्युरीचे सर्वात मोठे कारण आहे. गुडघ्याच्या मजबूतीसाठी हॅमस्ट्रिंग कर्ल्स, लेग प्रेस आणि फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज केल्या पाहिजेत.