‘ती’ 6 झाडं ज्यांच्याद्वारे तयार होतो सर्वात जास्त ऑक्सीजन, जी ठेवतात पर्यावरण शुद्ध, जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतात सध्या कोविड-19 चा कहर सुरू आहे. ऑक्सीजन कमतरता अनेक रूग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. हे सुरू असतानाच जर्मनीहून मोबाइल ऑक्सीजन प्लँट एयरलिफ्ट करणे आणि फायटर जेटच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने ऑक्सीजन बनवण्याचे वृत्त येत आहे. परंतु, या दोन्ही पर्यायात ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे की, तुमच्या वातावरणात किती ऑक्सीजन आहे. आपण त्या झाडांविषयी जाणून घेवूयात जी सर्वात जास्त ऑक्सीजन तयार करतात.

पर्यावरणासाठी वरदान आहेत ही झाडे
1 पिंपळाचे झाड
2 वडाचे झाड
3 लिंबाचे झाड
4 अशोकाचे झाड
5 अर्जुन वृक्ष
6 जांभळाचे झाड

सध्या कोविड-19 मुळे ऑक्सीजनचे संकट निर्माण झाल्याने सोशल मीडियावर झाडे लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीवर ऑक्सीजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे मानली जातात. कानपुर येथील हारकोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉक्टर पी. डी. दीक्षित यांच्यानुसार आज आपण जास्तीत जास्त झाडे लावली तर कदाचित ऑक्सीजनची इतकी कमतरता भासणार नाही.

त्यांनी म्हटले, पर्यावरणात ऑक्सीजन नसेल तर कोणत्याही प्लँटमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन करू शकणार नाही. यासाठी आवश्यक आहे की झाडे लावणे. डॉक्टर दिक्षित यांनी जास्त ऑक्सीजन देणारी झाडे सांगितली आहेत.