अनेक जणांमध्ये असते ‘या’ 7 आवश्यक पोषकतत्वांची कमतरता, डायटमध्ये आर्वजून समाविष्ट करा ‘या’ गोष्टी

पोलिसनामा ऑनलाइन – शरीरासाठी काही पोषकतत्व आवश्यक मानले जातात. मात्र, ही पोषकतत्व न्यूट्रीयंट्स खुप सामान्य आहे, परंतु तरीही अनेक लोकांमध्ये त्यांची कमतरता जाणवते. कोणते न्यूट्रीयंट्सची अनेक लोकांमध्ये कमतरता जाणवते आणि ती कशी पूर्ण करावी ते जाणून घेवूयात…

पोषकतत्व आणि आवश्यक पदार्थ

आयर्नची कमतरता
आयर्नच्या कमतरतेने अ‍ॅनिमिया होतो. रेड मीट, सालमन मासे, बीन्स, सीड्स, ब्रोकली, हिरव्या भाज्या आणि डाळींमधून हे मिळते.

आयोडीनची कमतरता
आयोडीनच्या कमतरतेने थायरॉइडच्या समस्या होतात. याच्यासाठी आहारात मासे, डेयरी प्रॉडक्ट आणि अंडी खा.

व्हिटॅमिन डीची कमतरता
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे इम्यून सिस्टम, हाडे कमजोर होतात. याच्यासाठी कॉड लिव्हर ऑईल, फॅटी फिश आणि अंडी सेवन करा. उन्हात उभे राहा, ते शक्य नसल्यास सप्लिमेंट घ्या.

विटामिन बी12ची कमतरता
हे रक्त, मेंदू आणि नर्वस सिस्टमसाठी आवश्यक आहे. याच्यासाठी मासे, मांस, अंडे आणि मिल्क प्रॉडक्ट सेवन करा.

कॅल्शियमची कमतरता
शरीरातील प्रत्येक पेशी आणि हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक असते. याची कमतरता असल्यास मासे, डेयरी प्रॉडक्ट आणि हिरव्या पालेभाज्या खा.

व्हिटॅमिन एची कमतरता
व्हिटॅमिन ए निरोगी त्वचा, दात, दृष्टी, इम्यून सिस्टम, हाडे आणि पेशींसाठी आवश्यक आहे. याची कमतरता असेल तर ऑर्गन मीट, फिश लिव्हर ऑईल, बीटा कॅरोटीन, बीट, गाजर आणि पालेभाज्या सेवन करा.

मॅग्नेशियमची कमतरता
याच्या कमतरतेमुळे हाडे व दात कमजोर होणे, टाइप 2 डायबिटीज, मेटाबोलिक सिंड्रोम, हृदय रोग, अस्वस्थता, मांसपेशींमध्ये वेदना आदी आजार होऊ शकतात. यासाठी कडधान्य, सूकामेवा, डॉर्क चॉकलेट आणि हिरव्या पालेभाज्या सेवन कराव्यात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like