‘खून’, ‘बलात्कार’ आणि ‘मॅच फिक्सिंग’मुळं ‘या’ 8 खेळाडूंना खावी लागली तुरुंगाची ‘हवा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वात असे बरेच खेळाडू असतील जे की बर्‍याचदा वादात भोवऱ्यात सापडले असतील. परंतु यामध्ये काही असेही वाद आहेत, ज्यामुळे या खेळाडूंना तुरुंगाचा सामना करावा लागला आहे. अशाच क्रिकेट विश्वातील काही खेळाडूंबद्दल जाणून घेउया…

१. मोहम्मद आमिर
पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याला २०१० मध्ये तुरुंगाची हवा खावी लागली होती. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे झालेल्या सामन्यादरम्यान त्याचे नाव पाकिस्तानचा कर्णधार सलमान बट्ट याच्यासमवेत मॅच फिक्सिंग प्रकरणी समोर आले होते.

२. बेन स्टोक
इंग्लंड क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर बेन स्टोक याला वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान एका तरूणाला शारिरीक इजा करण्याच्या आरोपाखाली तुरूंगात टाकण्यात आले होते.

३. एस श्रीसंत
टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज श्रीशांतचे नाव देखील आयपीएल सामना फिक्सिंग दरम्यान खराब झाले आणि त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर आजीवन बंदी घालण्यात आली आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आले. त्यानंतर ही बंदी उठविण्यात आली परंतु त्याची क्रिकेट कारकीर्द तोपर्यंत संपलेली होती.

४. अमित मिश्रा
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रावर एका महिला मैत्रिणीला किटली फेकून मारल्याचा आरोप होता ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवा खावी लागली होती.

५. नवज्योतसिंग सिद्धू
नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप होता. ज्यामुळे त्यांना १९८८ मध्ये ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण काही काळ तुरूंगात राहिल्यानंतर सिद्धू यांनी त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टाकडे दाद मागितली आणि कोर्टाने ते मान्य करून त्यांना सोडून दिले.

६. मखाया एंटिनी
दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मखाया एंटिनी याच्यावर १९८८ मध्ये २१ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या कारणास्तव त्याला तुरूंगात जावे लागले. इतकेच नव्हे तर आयसीसीने त्याच्यावर ६ वर्षाची क्रिकेट बंदीही लादली.

७. सलमान बट्ट
२०१० ला लॉर्ड्स मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यादरम्यान सलमान बट्ट या पाकिस्तानी खेळाडूवर मॅच फिक्सिंग चा आरोप लावण्यात आला, ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले होते.

८. मोहम्मद आसिफ
मोहम्मद आसिफ हा खेळाडूदेखील २०१० च्या इंग्लंड-पाकिस्तान सामन्याच्या मॅच फिक्सिंग प्रकरणात सामील होता त्यामुळे त्याला देखील तुरुंगाची हवा खावी लागली होती.