तुळशीचे ‘हे’ 9 घरगुती उपाय तुम्हाला अनेक आजारांपासून कायमचे ठेवतील दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  हिंदू धर्मात तुळशीला एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थायी मानून पूजा करण्यात येते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक ऊर्जाच प्राप्त होत नाही, तर बऱ्याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे.

घराच्या अंगणात आणि बाल्कनीत लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पूजनीय आणि पवित्र मानली जाते. तुळस हे फक्त एक हिरवे रोपटे नसून तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मामुळे गंभीर रोगांशी देखील सामना करणे सोप्प होते म्हणूनच तिला “क्वीन ऑफ हर्ब्स” असे म्हटले जाते. वेगवगेळ्या आजारांवर गुणकारी असणारी ही तुळस सौंदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केस यासाठी देखील लाभदायक ठरते. हिंदू धर्मातील घराघरात तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्येही वापरली जातात. त्याचा सुंधगही खूप सुंदर असतो. तसेच खाद्यपदार्थात त्याचा वापर केला जातो. तर आज आपण तुळशीचे विविध गुणांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

१. अल्सर आणि तोंडा संबंधीच्या असलेल्या संसर्गावर तुळशीची पाने लाभदायक ठरतात.

२. दररोज तुळशीची पाने चावून खाल्याने तोंडाचे आजार दूर होतात.

३. सकाळी पाण्यासोबत ५ तुळशीची पाने चावून खा. अनेक आजार दूर होतील. मेंदूचे आजार सुद्धा दूर होतात.

४. तुळस, अद्रक एकत्र मिश्रण करुन मधासोबत सेवन केल्यास सर्दी आणि ताप या आजारापासून आराम भेटू शकतो.

५. तुळशीचा मुळांचा काढा तापनाशक आहे.

६. डाग, खाज आणि त्वचेच्या आजारात तुळशीच्या पानांचा अर्क त्याठिकाणी लावल्यास काही दिवसात त्वचा रोग दूर होतो.

७. तुळशीच्या बिया खाल्यास विष चढत नाही.

८. एखाद्याच्या पोटात विष गेले असल्यास शक्य तितक्या तुळशीच्या पानांचा काढा प्या. विष दोष शांत होईल.

९. मासिक पाळी दरम्यान कंबरदुखी असल्यास तुळशीच्या पानांचा एक चमचा रस पिल्याने आराम भेटेल.