‘हे’ आहेत बॉलिवूडमधील ‘५’ साऊथ रिमेक सिनेमे, आता ‘कबीर सिंह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साउथमधील अनेक चित्रपटाचे रिमेक सध्या हिंदीमध्ये होत आहे. यामध्ये गजनी, सिंघम, राउडी राठोड सारखे सुपहहिट चित्रपट सामिल आहे. यामध्ये अजून एक चित्रपट सामिल झाला आहे. तो म्हणजे शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’. कबीर सिंह साउथ चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ चा रिमेक आहे. चित्रपटाचे डायरेक्शन संदीप वांगा हे करत आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटात अर्जुनची भूमिका विजय देवरकोंडाने साकारली होती. अशा अनेक साउथ चित्रपटाचे हिंदी रिमेक बनत आहे.

हे आहे बॉलिवूडचे ५ साउथ रिमेक चित्रपट

१. रहना है तेरे दिल मे
२००१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आजही या चित्रपटाचे वेड प्रेक्षकांना आहे. हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटात आर माधवन, सैफ अली खान आणि दिया मिर्जाने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘मिन्नाले’ चा रिमेक आहे.
Rehnaa Hai Terre Dil Mein

२. हंगामा
२००३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट हंगामा साउथचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे डायरेक्शन प्रियदर्शन यांनी केले होते. यामध्ये आफताब, अक्षय खन्ना, रिमी सेन, परेश रावल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट मलयालय चित्रपटाचा रिमेक आहे.
Hungama

३. गजनी
२००८ मध्ये प्रदर्शित झालेला गजनी मध्ये आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अमिर खानचा अभिनय प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली होती. हा चित्रपट तमिळ गजनी चा रिमेक आहे जो २००५ मध्ये प्रदर्शित झाला.
Ghajini

४. सिंघम
रोहित शेट्टी निर्देशित सिंघम पण साउथचा रिमेक आहे. यामध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती. अजयसोबत अभिनेत्री काजय अग्रवालने देखील मुख्य भूमिका साकारली आहे. याचा दुसरा पार्ट सिंघम रिटर्न्समध्ये अजय देवगन, करिना कपूर दिसले होते.
Singham

५. राउडी राठोड
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला राउडी राठोड साउथचा रिमेक आहे. यामध्ये अक्षय कुमारसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसून आले. चित्रपटाचे डायरेक्शन प्रभुदेवा यांनी केले होते. बॉलीवुडचा राउडी राठोड पहिले तेलुगूमध्ये विक्रमारकुडू, कन्नड़मध्ये वीर मदकारी, तमिलमध्ये सिरूथाई आणि बंगालीमध्ये बिक्रम सिंघा नावाने बनली आहे.
Rowdy Rathore

आरोग्यविषयक वृत्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

पालकभाजी आरोग्यासाठी फायदेशीर

Loading...
You might also like