‘ही’ पोट फुगण्याची 5 प्रमुख कारणं ! वेळीच बदला ‘या’ सवयी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक लोक असे आहेत ज्यांचं वजन जास्त नसतं तरीही त्यांना पोट फुगण्याची समस्या उद्भवते. याला कारण तुमचा आहार, स्ट्रेस आणि तुमचं पोश्चरही कारणीभूत असतं. याची 5 कारणं आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यामुळं काही चुका टाळल्या तरी तुम्ही यापासून दूर राहू शकता.

1) फायबर आणि प्रोटीन डाएट – फायबर आपल्या आतड्यांसाठी एक चांगलं मॅक्रोन्युट्रीएंट आहे. यामुळं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. परंतु फायबर मायक्रोफ्लोरा आतड्यांच्या विकासाला उत्तेजित करतं. यानं फायबरला पचवल्यानंतर गॅस तयार होतो. जर तुम्ही फक्त प्रोटीनयुक्त डाएट घेत असाल तर यामुळं मायक्रोबिअल विकासावर प्रभाव पडतो आणि पोट फुगतं.

2) एंग्जायटी – अमेरिकन कॉलेज ऑफ गस्ट्रोएंट्रोलॉजीनुसार जे लोक तणावात असतात ते प्रमाणापेक्षा जास्त हवा हवा पोटात घेतात. ही हवा पोटात जमा होते आणि पोट फुगतं. तणावामुळं पचनक्रियाही असंतुलित होते. यामुळंही पोट फुगतं. आपल्या मेंदूचा आणि आतड्यांचा थेट संबंध असतो. त्यामुळं तणावात असल्यानंही पोट फुगू शकतं.

3) हेही एक कारण – आपलं शरीर हे पोट फुगण्याच्या पद्धतीनंच तयार झालं आहे. जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा दोन गोष्टी होतात ज्यामुळं पोटात गॅस होतो. पहिली बाब अशी की, आतड्याच्या मांसपेशी टाईट होतात आणि तुमचा डायफग्राम छातीजवळ येतो. यामुळं गॅससाठी जागा तयार होते. काही लोकांचा डायफग्राम हा वर न येता खाली. तेव्हादेखील गॅससाटी जागा तयार होते आणि पोट फुगू लगातं. डायफग्राम अशी मांसपेशी आहे ज्यामुळं तुमची छाती आणि पोट वेगळं ठेवलं जातं.

4) मिठाचं अतिसेवन – आम्ही आहारातील मिठाबद्दल नाही तर तुमच्या जंक फूडमधील मिठाबद्दल बोलत आहोत. यावर तुमचं लक्ष नसतं. दिवसभरात जे काही जंक फूड तुम्ही खाता त्यातही मीठ असतं. तज्ज्ञ सांगतात की, शरीरातील या अतिरीक्त मिठाच्या पाण्यामुळं पोट फुगू शकतं.

5) चुकीच्या पद्धतीन बसणं (पोश्चर) – जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर पोटात गॅस तसाच राहतो आणि पोट फुगतं. चुकीच्या पद्धतीनं बसल्यानंही गॅस होतो आणि पोट फुगतं. जेव्हा तुम्ही सरळ बसता तेव्हा पोटावर प्रेशर येतो आणि गॅस बाहेर पडतो. पंरतु लगेचच झोपल्यानं गॅस तसाच पोटात राहतो आणि पोट फुगतं.