तूप हा पौष्टिक आहारातील महत्वाचा घटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डाएट करणारे तूपाचे पदार्थ खात नाहीत. परंतु, तूप हा पौष्टिक आहारातील महत्वाचा घटक असून तूपाच्या सेवनाने शरीराचे आरोग्य चांगले राहते. तूपाच्या सेवनाने त्वचा तजेलदार होते. तसेच यांतील पौष्टिक घटकांमुळे कोरडी त्वचा तजेलदार होते. तूपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशिअम अशी अनेक पोषक तत्वे असून यामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.

डोळ्यांच्या तक्रारी असल्यास तूपाचे सेवन करावे. ग्लुकोमा (काचबिंदू) रूग्णांसाठीही तूप लाभदायक आहे. आयुर्वेदातही सांगितले आहे की, तूपाच्या सेवनाने स्मरणशक्तीत वाढ होते, शिवाय मेंदूची कार्यक्षमताही वाढते. पोटातील गॅसचा त्रास असेल तर तूप खावे. यामुळे गॅसच्या समस्येत आराम पडतो. जेवणात तूपाचा समावेश केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. तूपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटरपेक्षा तुपाचे सेवन करणे चांगले असून घरच्या घरी तूप बनविल्यास ते अधिक लाभदायक आहे.