अनेक उपाय करूनही दात पिवळेच दिसतात ? असू शकतात ‘ही’ कारणं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आपली स्माईल चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्याचं काम करते. परंतु जर दातांवर पिवळेपणा असेल तर चेहऱ्यांचं सौंदर्य बिघडतं आणि तुमचं इंप्रेशनही चांगलं नाही पडतं. अनेकजण दातांच्या पिवळेपणाच्या समस्येनं त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही हा पिवळेपणा दूर होत नाही. यासाठी इतरही काही कारणं असू शकतात. आज आपण याची काही कारणं जाणून घेणार आहोत.

दात पिवळे होण्याची प्रमुख कारणं –

1) अनुवंशिकता – दातांच्या पिवळेपणाचं प्रमुख कारण आहे अनुवंशिकता. यामुळं काहींच्या दातांवर पिवळेपणा कायमच राहतो. अनेक उपाय करूनही हा पिवळेपणा दूर होत नाही. अनुवंशिकतेमुळंही असं होऊ शकतं.

2) पिण्याचं पाणी – तुम्ही पित असलेल्या पाण्यात जर फ्लोराईडचं प्रमाण जास्त असेल तर यानंही दातांवर पिवळेपणा येतो. त्यामुळं आपण ज्या पाण्याचं सेवन करतो हेही दातांवर प्रभाव टाकत असतं. याचीही काळजी घ्यायला हवी.

3) चहा-कॉफीचं सेवन – काहींना चहा खूप आवडतो तर कॉफी प्रचंड आवडते. अनेकजण दिवसातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा चहा किंवा कॉफीचं सेवन करतात. परंतु यात कॅफीन जास्त असतं. यामुळंही दातांचा शुभ्रपणा खराब होतो.

4) सायट्रीक / अॅसिडीक फ्रूट्स – हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचं तुम्ही सतत सेवन करत असाल तर दातांवर पिवळेपणा येतो. ही फळे जास्त आंबट असतात. सायट्रीक फ्रूट्समध्ये असलेल्या अॅसिडमुळं दातांवरील आवरण नष्ट होतं. यामुळं दातांवर पिवळेपणा येतो.

5) मिठाई – तुम्हाला गोड पदार्थांची जास्त आवड असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळं दातांचं खूप नुकसान होतं. मिठाई आणि डेजर्ट्समधील शुगरमुळं दातांमध्ये किड तर लागतेच सोबतच दातांवरील आवरणही नष्ट होतं. यामुळं दात पांढरे आणि चमकदार राहत नाहीत.

6) रात्री ब्रश न करणं किंवा कमी वेळ ब्रश करणं – जर तुम्ही रात्री ब्रश करत नसाल तर तुमचे दात हळूहळू पिवळे होण्यास सुरुवात होते. इतकंच नाही दातांमध्ये बॅक्टेरिया होऊ लागतात. दातांची चमक नाहीशी होते. कीडही लागते. जर तुम्ही फक्त दोनच मिनिटे ब्रश करत असाल तर तेव्हाही दात स्वच्छ होत नाहीत. त्यामुळं ब्रश करताना सावकाश आणि व्यवस्थित ब्रश करावा. तोंडाचा कानाकोपराही स्वच्छ करावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.