‘हे’ बॉलिवूड ‘स्टार’ वेल ‘एज्युकेटेड’ ; ‘टॉप’वर आहेत ‘बीग बी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील अनेक स्टार्स चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. परंतु चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराचे शिक्षण क्वचितच माहीत असेल. आज आपण अशा स्टार्सबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी चांगलं शिक्षण घेतलं. सर्वात जास्त शिक्षण घेणारा कलाकार कोण आहे, याचीही माहिती आज आपण घेणार आहोत.

1) अमिताभ बच्चन– तुम्हाला सांगू इच्छितो की, महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून किरोडीमल कॉलेजमधून सायन्स आणि आर्ट्स दोन्हीमध्ये डिग्री घेतली आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांना ऑस्ट्रेलियातील क्विसलँड युनिव्हर्सिटीनतून मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.

amitabh bachan

2) विद्या बालन- विद्या बालनने सेंट झेवियर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आहे. याशिवाय तिने युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने सोशलॉजीचा अभ्यास केला आहे.

Vidya Balan

3) शाहरुख खान- शाहरुख खानने चांगलं शिक्षण घेतलं आहे. शाहरुखने स्वोर्ड ऑफ ऑनरही प्राप्त केलं आहे. त्याने डीयुच्या हंसराज कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.

Shahrukh-Khan

4) जॉन अब्राहम- जॉन अब्राहमने जय हिंद कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. त्याने मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधून एमबीएची डिग्री घेतली आहे.

John-Abraham

5) अमीषा पटेल- अमीषा पटेलने युएसएच्या टफ्ट्स युनिव्हर्सिटीमधून अभ्यास पूर्ण केला आहे. अमीषाने इकॉनॉमिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे.

Amisha-patel

Article_footer_1
Loading...
You might also like