काय सांगता ! जगातील ‘या’ 10 देशांकडे स्वतःचं कोणतंही सैन्य नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची सैन्य शक्ती ही त्या देशाची मुख्य शक्ती असते आणि देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तेथील सैन्यावर अवलंबून असते, सैन्यातील शूर धाडसी सैनिक आपल्या देशासाठी बलिदान देण्यासाठीही तयार असतात. परंतु जगात असेही काही देश आहेत जिथे कोणतेही सैन्य नाही. जाणून घेऊयात काही खास गोष्टी-

1) एंडोरा- एंडोरा हा युरोपमधील सहाव्या क्रमांकाचा छोटा देश आहे. या देशाकडे कोणतंही सैन्य नाही. येथे कायदा व सुव्यवस्था आणि काही महत्त्वपूर्ण नियम ही पोलिसांची जबाबदारी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दहशतवादी हल्ला किंवा युद्धाच्या घटनेत हा देश आपले संरक्षण कसे करतो ! अशा परिस्थितीत, त्याचे शेजारील देश स्पेन आणि फ्रान्स आपत्कालीन परिस्थितीत लष्करी सुरक्षा प्रदान करतात.

2) कोस्टा रिका- 1948 मध्ये सिव्हील युद्ध झाल्यानंतर या देशाने आपल्या हद्दीतून सैन्याला बाहेर केले.  येथील अंतर्गत प्रकरणांची जबाबदारी इथल्या पोलिसांच्या खांद्यावर आहेत. सीमेवर असलेल्या देशाशी मतभेद असूनही ते लष्करी संरक्षणाशिवाय राहतात.

3) डोमिनिका-  1981 मध्ये आर्मीच्या काही विचित्र हालचालींमुळे या देशाने सैन्याला देशातून हद्दपार केले. इतर देशांसारखंच येथील पोलीस देशाची व्यवस्था चालवतात.

4) ग्रेनेडा-  अमेरिकेने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे सरकारने 1983मध्ये कठोर पावलं टाकत सैन्याला आपल्या भागातून दूर केले आणि सुरक्षेच्या हेतूने रिजिनल सिक्योरिटी सिस्टीमचे आयोजन केले.

5) हेतई- आर्मीकडून झालेला अचानक हल्ला देशासाठी सामान्य बाब होती, ज्यामुळे येथील सरकारने सैन्याला देशातून हाकलून लावले आणि 1995 पासून हा देश कोणत्याही सैनिकी बळाशिवाय प्रत्येक परिस्थितीचा सामना करत आहे.

6) आइसलँड- तुम्हाला आश्चर्च वाटेल की, 1869 पासून या देशात कोणतीही आर्मी नाही. आइसलँड नाटो संघटनेचा सदस्य आहे, ज्याने युनायटेड स्टेटसोबत आपल्या सुरक्षेचा करार केला आहे.

7) लँच्टेंस्टीन- या देशातून आर्मीला हटवण्याचं आर्थिक कारण होतं. हा देश सैन्याचा खर्च करण्यास सक्षम नव्हता. त्यामुळे येथून सैन्य हटवण्यात आलं. परंतु युद्धस्थिती निर्माण झाल्यास लोक एकत्र येऊन एक संघटना बनवतात, जिला आपत्कालीन सेना म्हणतात.

8) मोनॅको- या देशाने 17 व्या शतकात सैन्याचा त्याग केला होता. परंतु दोन छोटे मिलिट्री युनिट या देशात नेहमी सक्रिय असतात. यातील एक युनिट प्रिंसच्या सुरक्षेसाठी आणि दुसरं युनिट सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरथ आहे. मोनॅकोच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शेजारील देश फ्रांसवर आहे.

9) मॉरिशस- जगप्रसिद्ध देश मॉरिशसची जनतादेखील कोणत्याही सैन्याशिवाय रहाते. जवळपास 10,000 पोलीस कर्मचाऱ्यांनी बनलेली पर्सनल फोर्स सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याची काळजी घेते.

10) व्हॅटिकन सिटी- व्हॅटिकन सिटी इटलीमध्ये आहे आणि त्याचे स्वतःचे कोणतेही सैन्य नाही. इटलीची सैन्य व्हॅटिकन शहराचे अनौपचारिकरित्या संरक्षण करते.

आरोग्यविषयक वृत्त –