‘हे’ लैंगिक इच्छेचे 2 प्रकार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्स हा लाईफचा महत्त्वाचा भाग आहे. ही शरीराची गरजही आहे आणि आपलं नातं घट्ट बनवण्याचा मार्गही आहे. यावर आधारीत दोन प्रकारच्या सेक्स ड्राईव म्हणजेच इ्च्छा असतात. कधी तुम्हाला नैसर्गिक इच्छा( स्पॉन्टेनियस सेक्स ड्राईव) असते तर कधी प्रतिक्रियात्मक इच्छा (रिस्पॉन्सिव सेक्स ड्राईव) असते. तु्म्हाला सेक्स ड्राईवबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

स्पॉन्टेनियस ड्राईव –
जेव्हा तुमचं शरीर नाही पण मन किंवा मेंदू सेक्सची मागणी करतो तेव्हा त्याला स्पॉन्टेनियस सेक्स ड्राईव म्हणतात. कधी कधी मनात सेक्सचा विचार येतो आणि तुमची सेक्स करण्याची इच्छा होते. अनेकदा पॉर्न पाहिल्यानंतर असं होतं किंवा एखादं कपल पाहूनही होऊ शकतं. स्टडीनुसार, पुरुषांमध्ये महिलांपेक्षा जास्त स्पॉन्टेनियस सेक्स ड्राईव असते.

रिस्पॉन्सिव ड्राईव –
जेव्हा शरीर सेक्सची मागणी करतं तेव्हा रिस्पॉन्सिव ड्राईव असते. पुरुषांमध्ये असं झालं तर इरेक्शन होतं तर महिलांच्या योनीत ताण निर्माण होतो. रिस्पॉन्सिव ड्राईव महिलांमध्ये जास्त असते.

ओळखा तुमची ड्राईव
दोन्ही प्रकारच्या सेक्स ड्राईव लक्षात आल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा आणि पार्टनरची इच्छा चांगल्या प्रकारे समजू शकता. यानंतर तुमची सेक्स लाईफ अधिक आनंददायक होऊ शकते. फक्त एकच प्रकारची सेक्स ड्राईव असणं गरजेचं नाही. एका व्यक्तीला विभिन्न वेळी विभिन्न सेक्स ड्राईव होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like