जगातील ‘या’ प्रसिध्द सेलिब्रेटी निरोगी राहण्यासाठी ‘प्राशन’ करतात स्वतःचेच ‘मूत्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेलिब्रेटी अनेकदा आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असतात. कोणी विवादास्पद टिपण्णी करण्यावरून तर कोणी आपल्या राहणीमानावरून सतत चर्चेत राहत असत. अशातच एक ट्रेंड असा देखील आहे यामध्ये सेलिब्रेटी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी स्वतःचेच मूत्र पितात. होय हे खरे आहे आज आपण अशाच सेलिब्रेटी विषयी माहिती घेणार आहोत.

इंस्टाग्रामवर मूत्र पुण्याचा व्हिडीओ टाकण्याच्या व्यतिरिक्त 1994 मध्ये मॅडोना ने डेविड लेटरमन च्या शो वर बोलताना सांगितले होते की, आपल्या पायांना ठीक करण्यासाठी ती आपल्या पायावर लघवी करत असे. इंग्लंडची अभिनेत्री राहिलेल्या सारा मिल्स ने देखील एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ती गेल्या तीस वर्षांपासून स्वतःचेच मूत्र पीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एका भागामध्ये दिसलेले बीयर ग्रिल्स यांनी देखील कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला कसे वाचवायचे हे अनेकदा दाखवून दिलेले आहे. असेल त्या परिस्थिती राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशावेळेस त्यांनी अनेकदा स्वतःचेच मूत्र पिल्याचे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. 2013 चे प्रसिद्ध पॉप सिंगर केशा यांनी देखील एका माहितीपटादरम्यान स्वतःचेच मूत्र पिले होते. यावेळी त्यांना स्वतःच्या तब्बेतीबाबत प्रयोग करायचे होते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता.

Visit : Policenama.com