Diwali 2020 : भारताशिवाय ‘या’ 10 देशांमध्येसुद्धा धूमधडाक्यात साजरी केली जाते दिवाळी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    फिजी (Fiji) मध्ये मोठ्या भारतीय लोकसंख्येमुळे दिवाळी धूमधडाक्यात साजरी होते. येथे दिवाळीची सार्वजनिक सुटीसुद्धा असते. लोक एकमेकांना गिफ्ट आणि पार्टी देतात. शाळा आणि कॉलेज बंद असतात.

Indonesia :  इंडोनेशियात भारतीय लोकसंख्या जास्त नसली तरी येथेही दिवाळी साजरी केली जाते. येथे दिवाळी मोठा सण आहे.

Malaysia :  भारतापेक्षा वेगळी, मलेशियात हिरवी दिवाळी असते. इतरही प्रथा वेगळ्या आहेत. दिवसाची सुरुवात लोक तेलाने आंघोळ करून करतात आणि विविध मंदिरात पूजा करतात. फटाक्यावर बंदी असल्याने येथे भेट, मिठाई आणि शुभेच्छा देतात.

Mauritius :  तुम्ही जाणून हैराण व्हाल की, मॉरीशसची 50 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. दिवाळी येथे धूमधडाक्यात साजरी होते आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टीसुद्धा असते.

Nepal :  दिवाळीला नेपाळमध्ये तिहाड संबोधले जाते. येथे भारतासारखाच उत्साह असतो. घर सजवणे, एकमेकांना गिफ्ट देणे आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे.

Sri Lanka :  श्रीलंकेतसुद्धा हिंदूंची लोकसंख्या मोठी आहे आणि यामुळे येथे दिवाळी धूमधडाक्यात साजरी होते.

Canada :  मोठ्या संख्येने पंजाबी लोक येथे स्थायिक झाल्याने कॅनडामध्ये पंजाबी तिसरी अधिकृत भाषा आहे. येथेही दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली जाते.

Singapore :  भारतानंतर जर कुठे मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जात असेल, तर ते सिंगापुर आहे. सजावट, रांगोळी आणि जल्लोषात येथे दिवाळी साजरी होते.

United Kingdom :  युकेच्या अनेक शहरात, विेशेषता बर्मिंगहॅम आणि लीसेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होते. येथे मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात.

Trinidad and Tobago :  तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, कॅरेबियन बेटांवरील त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली जाते, शिवाय रामलीलाचेसुद्धा मंचन येथे होते.