‘या’ आहेत जगातील सर्वाधिक पसंतीच्या 5 अभिनेत्री, नंबर 5 ही एक भारतीय अ‍ॅक्ट्रेस, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिने सृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सौंदर्याचे लाखो दीवाने आहेत. आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं सौंदर्य जगातही अप्रतिम आहे. यात एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश आहे.

1) स्कारलेट जोहानसन- हॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमा अॅव्हेंजर्स एंडगेम आणि लुसी यामध्ये काम करणारी अभिनेत्री स्कारलेट जोहानसन एक सुंदर अभिनेत्रीपैंकी एक मानली जाते.

https://www.instagram.com/p/B7qpRVTnzcw/?utm_source=ig_web_copy_link

2) फॅन बिंगबिंग- फॅन बिंगबिंग आपला शेजारील देश चीनमधील सुपरस्टार आहे. तिनं अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. फॅन बिंगबिंगच्या सौंदर्याची दुनिया दीवानी आहे.

3) एमा वॉटसन- एमानं अवघ्या 9 वर्षाची असताना ब्लॉकबस्टर सिनेमा हैरी पॉटर मध्ये प्रमुख भूमिकांपैकी एक हरमायनी ग्रेनजरची भूमिका साकारली होती. यानंतर तिनं ब्युटी अँड द बीस्ट या सिनेमातून खूप नाव कमावलं. जगात सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या अभिनेत्रीपैंकी एमा एक आहे.

4) जेनिफर लॉरेंस- हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर लॉरेंस द हंगर गेम्स आणि रेड स्पॅरो यांसारखे अप्रतिम सिनेमे केले आहेत. जेनिफरनं 14 व्या वर्षीच करिअरला सुरुवात केली होती.

https://www.instagram.com/p/B4if4_7JRYB/?utm_source=ig_web_copy_link

5) रकुल प्रीत सिंह- रकुल प्रीतचे चाहते जगभर आहेत. सौंदर्याच्या बाबतीत रकुल अजिबात कमी नाही. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे.