‘या’ 3 सोप्या पध्दतीनं माहिती करून घ्या तुमच्या अकाऊंटचा बॅलन्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्खा – जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुमचा पीएफ नक्कीच कापला जात असेल. अनेकदा ईपीएफओमधील आपल्या पीएफ मधील जमा रक्कम किती आहे याची महिती जाणून घेण्यास समस्या उद्भवते. ही रक्कम किती आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी काही पद्धती आहेत.

1. ऑनलाइन पासबुकच्या माध्यमातून जाणून घ्या तुमचा पीएफ
ईपीएफओच्या वेबसाइटवर ईपीएफ बॅलेंस जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. या वेबसाइटवर तुम्हाला ई-पासबूक लिंक वर जावे लागेल आणि तेथे तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. या वेबसाइटवर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला व्ह्यू पासबूक वर क्लिक करावे लागेल. येथे पीएफ बॅलेंसची पूर्ण माहिती मिळेल. ज्यातून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुुमचा पीएफ बॅलेंस किती जमा झाला आहे.

2. फोनवरुन मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या बॅलेंस
तुमचा पीएफ बॅलेंस तुम्ही फक्त एका मिस्ड कॉलवरुन मिळवू शकतात. जो मोबाइल नंबर तुम्ही यूनिफाइड पोर्टलवर नोंदवला आहे त्यावरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या, मिस्ड कॉलनंतर तुम्हाला ईपीएफओचा एक मेसेज येईल. यातून तुम्हाला पीएफ संबंधित माहिती मिळेल.

3. अ‍ॅपच्या माध्यमातून तपासा पीएफ बॅलेंस
ईपीएफओने एक अ‍ॅप लॉन्च केले आहे, या माध्यमातून तुम्हाला पीएफचा बॅलेंस चेक करता येईल. यासाठी अ‍ॅपवर किंवा वेबसाइटवर जाऊन यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकून तुमच्या पीएफची माहिती तुम्हाला मिळेल. येथे तुम्हाला सर्वात आधी मेंबरवर क्लिक करावे लागेल.यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ बॅलेंसचा तपशील तपासू शकतात.

Visit : Policenama.com