हे ‘3 idiots’ अधिकारी PM नरेंद्र मोदी बनवतात अधिक ‘पावरफुल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सरकारची आणि देशाची घडी बसवण्यास सुरुवात केली आहे. मंत्र्यांबरोबरच नरेंद्र मोदी आपल्या अधिकाऱ्यांबरोबर देखील समतोल राखून काम करत असतात.

पहिल्या कार्यकाळात देखील त्यांनी आपल्या विश्वासातील अनेक अधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात नेमणूक करून त्यांचा उपयोग करून घेतला होता. तशाच प्रकारे या कार्यकाळात देखील ते आपल्या अधिकाऱ्यांवर प्रचंड विश्वास दाखवत आहेत. मात्र केंद्र सरकारमधील हे तीन अधिकारी आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींना सर्वात जास्त विश्वास आहे. हे अधिकारी कोण ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोण आहेत हे अधिकारी चला पाहुयात :

१)नृपेंद्र मिश्र
१९६७ च्या यूपी कॅडरमधील हे अधिकारी नरेंद्र मोदी यांच्या फार जवळ आहेत. सध्या नृपेंद्र मिश्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नृपेंद्र मिश्र जबाबदारी सांभाळतात. पंतप्रधान कार्यालयातून राबवण्यात येणाऱ्या योजनांवर त्यांचे लक्ष असते. प्रशासकीय गोष्टींबरोबरच त्यांना राजकीय गोष्टींची देखील आवड आहे.

२)पीके मिश्र
१९७२ च्या गुजरात कॅडरमधील हे अधिकारी नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात अतिरिक्त प्रधान सचिव आहेत. त्याचबरोबर कॅबिनेट सचिवालयासोबत समन्वय राखण्याचे काम देखील ते करत असतात. अर्थशास्त्रात पीएचडी झालेले पीके मिश्र हे जागतिक बँकेच्या सल्लागार समितीमध्येही सहभागी आहेत.

३)अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोवाल मोदींच्या टीममध्ये फार महत्वाची भूमिका पार पाडतात. २००४-०५ या दरम्यान ते आयबीच्या संचालकपदी होते. सध्या ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. सर्जिकल स्ट्राईकपासून बालकोट एअर स्ट्राईकपर्यंतच्या अनेक निर्णयात अजित डोवाल यांचा सहभाग होता. मोदींच्या पाठमागे कणखर उभा असणार हा अधिकारी मोदींच्या मर्जीतला खास अधिकारी आहे.
त्यामुळे कर्तव्यदक्ष मंत्र्यांप्रमाणेच मोदींकडे अधिकारी देखील असल्याने इतक्या मोठ्या देशाचा कारभार चालवणे मोदींना शक्य होत आहे. त्याचप्रमाणे चाणक्याप्रमाणे मोदींना सल्ला देण्याचे देखील काम हे अधिकारी करत असतात.

आरोग्य विषयक वृत्त –

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

You might also like