ब्रश करताना ’या’ 6 चुका कधीही करू नका, वेळीच व्हा सावध, अन्यथा होईल नुकसान

सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे हे नित्याचेच काम आहे. शरीराच्या स्वच्छतेपैकी तो एक अतिशय महत्वाचा भाग आहे. परंतु, काही वेळा याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खरं तर तोंडाचे आरोग्य चांगले असेल तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. यासाठी दररोज न चुकता ब्रश करणे, एवढेच पुरे नसून त्यासाठी योग्य पद्धतीने ब्रश करणे आवश्यक आहे. नकळत अनेकांकडून ब्रेश करताना काही चुका होतात या चुकांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. ब्रश करताना कोणत्या चुका करू नयेत ते आपण जाणून घेवूयात.

या चुका करू नका

1 ब्रश करण्याचा कालावधी
ब्रश करण्याचा कालावधी हा साधारण दोन ते तीन मिनिटांचा असावा, असे अमेरिकन डेंटल असोसिएशनने म्हटले आहे. पण अनेकजण खुप वेळ ब्रश करत बसतात.

2 टूथब्रश तोंड मोठं
तोंडात सहजपणे फिरवता येईल, कुठेही न लागता आरामात ब्रश करता येईल, असा ब्रश वापरा. मोठ्या आकाराचा टूथब्रश असल्यास जास्त वेळही लागतो.

3 जुना टूथब्रश
दातांना सॉफ्ट ब्रशची गरज असते. जुना ब्रश वापरून वापरून रफ होतो. तज्ज्ञांनुसार, टूथब्रश दर तीन महिन्यांनी बदलावा. म्हणून जूना ब्रश वापरू नका.

4 ब्रश करण्याची पद्धत
वेळोवेळी टूथब्रश बदला, तो स्वच्छ ठेवा. जास्त लहान किंवा जास्त मोठा ब्रश वापरू नका. दिवसातून किमान दोनदा ब्रश करा.

5 दाब देऊ नका
दाब देऊन ब्रश केल्याने दात जास्त चमकण्याऐवजी नुकसानच होते. जास्त दबाव देऊन ब्रश केल्यास कीटाणू मरण्याऐवजी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासाठी तुम्हाला दातांवर दबाव टाकण्याची गरज नाही, असे लॉस एंजेलिसच्या स्कूल ऑफ डेंटिस्टीच्या डीन डॉ. हेवलेट यांनी म्हटले आहे.

6 योग्य अँगल
वर आणि खाली दातांची चांगली स्वच्छता व्हावी यासाठी ब्रश व्यवस्थित पकडा आणि दातांच्या छोट्या गॅपमध्ये फिरवा. या गॅप्समध्येच कीटाणू जमा झालेले असतात.