जायरा वसीमनेच नव्हे तर ‘या’ अभिनेत्रींनी देखील घेतली होती अचानक ‘Exit’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री जायरा वसीमने अचानक बॉलीवूडमधून संन्यास घेऊन अनेक चाहत्यांना आश्चर्यचकीत केले आहे. जायराने सांगितले की, ती पाच वर्ष बॉलिवूडमध्ये होती पण या फिल्डमध्ये ती खुश नव्हती. जायरा एकच अभिनेत्री नाही जी अचानक इंडस्ट्रीमधून बाहेर पडली आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे ज्या बॉलिवूडमधून अचानक बाहेर पडल्या आहेत.

१ . आयशा कपूर –
संजय लिला भन्साळीचा चित्रपट ‘ब्लॅक’ मध्ये बालकलाकार म्हणून काम करणारी आयशा कपूर हीच्या अभिनयाचे खूप कौतुक केले होते. तिने दोन चित्रपटात काम केल्यानंतर बॉलिवूड चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता.

https://www.instagram.com/p/By74VqWF_GL/

२. आयशा टाकिया –
आयशा टाकियाने सलमान खानसोबत चित्रपट ‘वॉन्टेड’ मध्ये काम केले होते. यानंतर ती खूप प्रसिद्ध झाली होती. तिने समाजवादी पार्टीच्या नेत्याचा मुलगा फरहान आजमी यांच्यासोबत लग्न केले. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करणे बंद केले. हे एकल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

https://www.instagram.com/p/ByrrRU-H2dy/


३. मयूरी कांगो –
१९९६ मध्ये चित्रपट ‘पापा कहते हैं’ या गाण्यामुळे मयूरी खूपच चर्चेमध्ये आली होती. याव्यतिरिक्त तिने १९९५ मध्ये नॅशनल अवॉर्ड चित्रपट ‘नसीम’ मध्ये देखील काम केले होते. त्याचबरोबर ती १९९७ मध्ये आलेला चित्रपट ‘बेताबी’ आणि २००० मध्ये आलेला चित्रपट ‘बादल’ मध्ये दिसून आली होती. ३ वर्षानंतर एनआरआईसोबत लग्न केल्यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा केले. लग्नानंतर तिने आपले करिअर तिथेच थांबवायचे ठरविले. सध्या मयूरी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे.

४. ममता कुलकर्णी-
९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये मोठी कलाकार होती. तिने आपल्या शानदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले होते. २००० मध्ये तिने बॉलिवूडमधून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. हे कळताच तिचे चाहते खूप निराश झाले होते. १५ वर्षानतर ती ‘केन्या’ मध्ये दिसून आली होती. ती तिचे पुस्तक ‘ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगिनी’ मधून खूप चर्चेत आली होती. आपल्या ग्लॅमरस अवतारामुळे ती खूपच प्रसिद्ध होती.

 

#Doctorsday2019 : म्हणून… साजरा केला जातो ‘डॉक्टर्स डे’

लहान मुलांच्या आरोग्यासाठी ‘घोळ मासा’ फायदेशीर

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी