‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील नात्यांमध्ये काही ना काही अडचणी येत असतात. येथे कोण कधी रंग बदलेल हे काही सांगता येता नाही. काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पतीसोबत सुखाने आयुष्य काढताना त्यांनी आपल्याच पतीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. आज आपण अशाच अभिनेत्रींबद्दल माहिती घेणार आहोत.

1) युक्ता मुखी
मिस इंडिया राहिलेली युक्ता मुखीने आपल्या बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीला अनेक बॉलिवूड सिनेमात काम केले. परंतु तिचे सिनेमे जास्त न चालल्याने ती बॉलिवूड इंडस्ट्रीत जास्त दिवस टिकू शकली नाही. त्यानंतर तिने लग्न केलं. तिला एक मुलगाही झाला. परंतु लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर युक्ताने आपल्या पतीवर मारहाण करणं आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. युक्ताचं म्हणणं आहे की, तिचा नवरा तिला घाण घाण शिव्या देतो आणि तिचा मारहाण करतो.
Yukta Mookhey
2) मंदाना करिमी
बिगबॉसमध्ये सलमान खानची फेवरेट असलेली मंदाना करिमी शोमध्ये आपल्या बॉयफ्रेंडची स्तुती करताना अजिबात थकत नव्हती. शोमधून बाहेर आल्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नही केलं. परंतु एक वर्षही लग्नाला पूर्ण झालं नाही आणि दोघांमध्ये तणावाला सुरुवात झाली. मंदानाने तिच्या पतीवर आरोप केला होता की, तिचा पती तिच्यवार धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यामुळे तो तिला मारहाण करतो. त्याने अनेकदा तिचे लैंगिक शोषणही केले आहे.
Mandana Karimi
3) सोफिया हयात
बिगबॉस शोमुळे चर्चेत आलेली सोफिया हयात शोमधून बाहेर पडल्यानंतर नन बनली होती. यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. लग्नाला काहीच महिने झाले आणि सोफियाने आपल्या पतीविरोधात पोलिसांत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.
 Sofia Hayat

आरोग्याविषयक वृत्त

पंतप्रधान मोदींनी सांगितले पवनमुक्तासनाचे फायदे
रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले

लठ्ठपणामुळे लहान मुलही होऊ शकतात उच्च रक्तदाबाचे ‘बळी’

You might also like