‘हिमेश रेशमिया’सह ‘या’ 4 कलाकारांनी घटस्फोटानंतर लागलीच केलं दुसरं लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये लग्न आणि घटस्फोट ही एक कॉमन बाब आहे. अनेक स्टार्स असे आहेत जे लग्न करतात घटस्फोटही घेतात. काही तर असेही आहेत जे दुसरं लग्न करताना ज्यांनी जराही विलंब केला नाही. अशाच काही स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत.

1) करण सिंग ग्रोवर – टीव्हीमधील प्रसिद्ध अभिनेता करण सिंग ग्रोवरनं सर्वात आधी श्रद्धा निगमसोबत लग्न केलं. यानंतर जेनिफर विंगेटसोबत दुसरं लग्न केलं. हे लग्नही जास्त काळ टिकलं नाही. अखेर त्यांनं बिपाशासोबत लग्न केलं. अलोन सिनेमादरम्यान अलोन असणाऱ्या करणला बिपाशासोबत प्रेम झालं. नंतर दोघांनी लग्न केलं. या सिनेमात ते एकत्र दिसले होते.

2) रघु राम – एम टीव्ही रोडीज फेम रघु रामनं सुगंधासोबत पहिलं लग्न केलं. यानंतर दुसरा जोडीदार शोधायलाही विलंब केला नाही. 2006 साली त्यानं सुगंधासोबत लग्न केलं होतं. 10 वर्षांनंतर 2018 मध्ये घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं. 12 डिसेंबर 2019 मध्ये रघुनं गर्लफ्रेंड नताली सोबत लग्न केलं.

3) हिमेश रेशमिया – हिमेश रेशमिया यानंही पहिली पत्नी कोमलला घटस्फोट देऊन मे 2018 मध्ये गर्लफ्रेंड सोनिया कपूर सोबत लग्न केलं होतं. 1995 साली हिमेशनं कोमल सोबत पहिलं लग्न केलं होतं. 2017 मध्ये दोघे वेगळे झाले.

4) सुमित व्यास – सुमित व्यासनं घटस्फोटानंतर लगेचच दुसरं लग्न केलं होतं. सुमितनं ॲक्ट्रेस शिवानी टंकसाळे सोबत लग्न केलं होतं. 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आतच ॲक्ट्रेस एकता कौलसोबत दुसरं लग्न केलं.