बॉलिवूडचे ‘हे’ टॉप ५ कलाकार करु शकत नाहीत भारतात मतदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मदतानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत सामान्य लोकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील मतदानाचा हक्क बजावत असतात. परंतु बॉलिवूडमधील अशी काही नावं आहेत जी लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. यात काही टॉपच्या कलाकारांचा समावेश आहे.

1) अक्षय कुमार- बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार हा या निवडणुकीत मतदान करू शकणार नाही. अक्षय कुमारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला आहे. परंतु अधिकृतपणे तो भारताचा नागरिक नाही. अक्षय कुमारकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. भारतीय नियमानुसार तुम्ही दोन देशाचं नागरिकत्व ठेवू शकत नाही. त्यामुळे तो भारतात मतदान करू शकत नाही.

2) आलिया भट्ट- आलिया भट्टची आई सोनी राजदान या ब्रिटीश नागरिक आहेत. शिवाय आलियाकडेही ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्यामुळे आलिया भारतात मतदान करू शकत नाही.

3) दिपिका पादुकोण- बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील भारतात मतदान करु शकत नाही. तिचे वडिल भारतीय आहेत परंतु दीपिकाचा जन्म हा डेन्मार्कच्या Cpenhagen मध्ये झाला आहे. तिच्याकडे Danish पासपोर्ट आहे.

https://www.instagram.com/p/BVCQFpJhu6z/

4) कतरीना कैफ- बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ भारतात मतदान करू शकत नाही. तिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. कतरीनाचे वडिल काश्मिरी आहेत आणि तिचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला आहे. तिची इच्छा असली तरीही ती भारतात मतदान करू शकणार नाही.

5) जॅकलिन फर्नांडिस- टॉपच्या अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे जॅकलीन फर्नांडिस. जॅकलिनचा जन्म हा Bahrain च्या Manama मध्ये झाला आहे. तिचे वडिल श्रीलंकेचे तर आई मलेशियाची नागिरक आहे. जॅकलिन हीदेखील भारतात मतदान करू शकत नाही. 2006 मध्ये जॅकलिनने मिस युनिव्हर्स श्रीलंका स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.