Sex Life : मासिक पाळी दरम्यान सेक्स करताना या गोष्टींची काळजी घ्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मासिक पाळी म्हणजे मानवी जीवनातील सर्वात महत्वाची बाब आहे. मासिक पळी जर नसती तर मानव जातीची उत्पत्ती थांबली असती. एवढी मासिक पाळी आवश्यक असते. तर काही असंयमी माणसांना मासिक पाळीत हि सेक्स करण्या वाचून रहावत नाही. मासिक पाळीत सेक्स करणे योग्य आहे का? तर याचे उत्तर हो आहे. कारण डॉक्टरांनी हि यात काहीच गैर नसल्याचे म्हणले आहे परंतु मासिक पाळीच्या काळात सेक्स करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या गोष्टी काय आहेत ते आपण आज पाहूया

प्रेमाच्या आडून करू नका जबरदस्ती 
आपण आपल्या जोडीदाराला प्रेमाने एकांदी गोष्ट मागितली तर आपला जोडीदार ती गोष्ट देण्यास आपणाला नकार देऊ शकत नाही अशाच प्रकारे आपण प्रेमाच्या असून मासिक पाळीच्या काळात सारखी सारखी सेक्सची मागणी करू नये. आपल्या प्रियसीची सम्मती असेल तरच अशा काळात सेक्स करावा अन्यथा आपण तिच्याशी सेक्ससाठी जबरदस्ती करू नये.

प्रियसीच्या कलेने घ्या आणि तिला आनंद द्या 
स्त्रीला  या दिवसात खूप लवकर उत्तेजना प्राप्त होते म्हणून तिला सेक्स मध्ये जास्त तारसवू नका. तसेच सेक्स तिला तिच्या कलेने घेऊ द्या कारण या दिवसातील सेक्स जर तुम्ही तिच्या कलेने घेतला तर त्या सेक्सचा तिला आनंद मिळतो आणि तिच्या मासिक पाळीच्या तणावाचा आणि त्रासाचा तिला विसर पडतो.

मासिक पाळीच्या काळात योग्य स्थितीत सेक्स करा 
मानवी प्रणयक्रीडेचे अनेक प्रकार आपणाला पाहण्यास मिळतात. तसेच अनेक प्रकारे हि प्रणय क्रीडा आपण अनुभवत असतो. परंतु मासिक पाळीच्या काळात सहज आणि सोप्या प्रणय क्रीडा आपण कराव्या जेणेकरून आपल्या प्रियसीला त्या सेक्सचा त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या.

कॉन्डम शिवाय सेक्स करू नका 
या काळात महिलेच्या गुप्तभागत खूप उष्णता असते आपण जर कॉन्डम विरहित सेक्स केला तर  महिलेच्या गुप्तभागातील उष्णतेचा संसर्ग होऊन आपल्या लिंगावर पुरळ येण्याचा धोका असतो म्हणून आपण मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करत असाल तर या गोष्टीची काळजी घ्या कि आपण कॉन्डमच्या साह्यानेच सेक्स करा. जनेकरून मासिक पाळीच्या काळात सेक्स केल्याने आपल्याला कोणते ही दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत.

एकंदर मासिक पाळीच्या काळात महिलांना आपण अराम करू दिलेलाच बरा असतो कारण या काळात महिलांना शरीर थकल्या सारखे वाटते. तसेच संयमाचा बांध फुटल्यावर कधी तरी अशा दिवसात सेक्स करणे बरे राहते.