पाठीच्या मणक्याची काळजी घेणे गरजेचे

पोलीसनामा ऑनलाइन – स्पाइनल कॉर्ड शरीरामध्ये अत्यंत महत्वाचे काम करते. हे मेंदूपासून शरीराच्या इतर अवयवांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे महत्वाचे काम याद्वारे होते. स्पाइनल कॉर्ड लवचिक असल्याने हालचाल करणे, बसणे, उठणे यांसारख्या क्रिया करता येतात. त्यामुळे स्पाइनल कॉर्डला दुखापत झाल्याने संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. शरीराची हालचाल करणेही अवघड होते.

स्पाइनल कॉर्डचा सर्वात जास्त परिणाम हातांवर आणि पायांवर होतो. शरीराच्या या महत्वाच्या भागाला दुखापत झाल्यास अनेक समस्या निर्माण होतात. स्पाइनल कॉर्ड सुरक्षित ठेवणे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे स्पाइनल कॉर्ड एन्जुरीबाबत माहिती असल्यास हा धोका आपण टाळू शकतो. विशेष म्हणजे स्पाइनल कॉर्ड इन्जुरीचा धोका महिलांपेक्षा पुरूषांना जास्त भेडसावतो. स्पाइनल कॉर्ड इन्जुरीचा धोका टाळण्यासाठी फोर व्हिलर चालवताना सीट बेल्टचा प्रयोग करावा. तसेच टूव्हिलर चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. कोणतेही वाहन मद्यधुंद अवस्थेत चालवू नये. याव्यतिरिक्त वाहनाच्या वेगावरही नियंत्रण आवश्यक आहे. कमी पाणी असणाऱ्या ठिकाणी स्विमिंग करू नये. शरीराला जास्त कष्ट करावे लागतील अशी काम करणं शक्यतो टाळावे. खेळताना स्वतःची काळजी घेऊन खेळले पाहिजे.

मणक्याच्या हाडांना लागणाऱ्या प्रकरणांमध्ये ८२ टक्के पुरूषांचा समावेश आहे. स्पाइनल कॉर्ड इन्जुरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे, रोड अ‍ॅक्सिडंट आहे. रोड अ‍ॅक्सिडंट दरम्यान स्पाइनल कॉर्डवर परिणाम होऊ शकतो. खेळताना स्पाइनल कॉर्डला दुखापत होऊ शकते. अर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस, कॅन्सर आणि इतर इन्फेक्शन्समुळे स्पाइनल कॉर्ड दुखापत होऊ शकते. कधी-कधी मस्तीमध्ये किंवा भांडणामध्ये स्पाइनल कॉर्डला दुखापत होते. वृद्ध माणसांमध्ये स्पाइनल कॉर्ड इन्जुरी पडल्यामुळे होऊ शकते.