व्हिटॅमिन-डी ची कमतरता आरोग्यासाठी घातक

पोलीसनामा ऑनलाइन – व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश असून याशिवाय अनेक पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढवतात. अधिक शारीरिक श्रम करणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन-डीची अधिक कमतरता आढळते. व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. हेच व्हिटॅमिन-डी कमी झाल्यास अनेक शारीरीक समस्या निर्माण होऊ शकतात.

शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता निर्माण झाल्यास अस्थमा आणि हार्ट अटॅकसारखे आजार होऊ शकतात. शरीरामध्ये सूज वाढत जाते. त्यामुळे अस्थमाची समस्या होते. व्हिटॅमिन-डी शरीरामध्ये सूज वाढविणाऱ्या प्रोटीन्सला फुफ्फुसांपासून दूर ठेवते. तसेच ब्लड प्रेशर वाढण्याची आणि हार्ट अटॅक येण्याची भीती वाढते. शरीराला ऊन न मिळाल्यामुळे व्हिटॅमिन-डी तयार करणारी तत्व कोलेस्ट्रॉलमध्ये बदलतात. शरीरामध्ये व्हिटॅमिन-डीचं प्रमाण कमी झाल्यास रोगप्रतिकार शक्तीदेखील कमी होते. यामुळे सर्दी-खोकला आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि व्हिटॅमिन-डीची कमतरता जर एकत्र झाली तर मात्र डायबिटीज धोका अधिक असतो.

मुलांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता मोठ्या कालावधीसाठी राहिल्यास एनीमियासारखा गंभीर आजार होऊ शकतो. तसेच यामुळे मेंदूवरही परिणाम दिसून येतो. मेंदूमधील केमिकल सेरोटोनिन किंवा डोपामिन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन-डी अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे कॅन्सर, टीबी, हाडे कमकुवत होणे, हृदयाशी निगडीत आजार, स्नायूंमध्ये वेदना होणे, लठ्ठपणा आदी आजार संभवतात. जेवणामधून पुरेसे व्हिटॅमिन-डी शरीराला न मिळणे, शरीराला सूर्यकिरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन-डी पुरेशा न मिळणे, लिव्हर आणि किडनीतून व्हिटॅमिन-डी योग्य प्रमाणात परिवर्तीत न होणे, इतर आजारांसाठी खाण्यात येणाऱ्या आजारांमुळे व्हिटॅमिन-डी शरीरापर्यंत न पोहचणे आदी कारणामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कतरता निर्माण होते.

You might also like