नाकाला शेप देण्यासाठी करा ‘या’ 5 सोप्या एक्सरसाईज ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – नाक चेहऱ्याच्या सौंदर्याचा केंद्रबिंदू मानला जातो. अशात नाकाचा आकार नीट ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. काही लोक मेकअपचा सहारा घेतात तर काही लोक चक्क सर्जरी करतात. आज आपण नाक शेपमध्ये आणण्यासाठी काही व्यायाम जाणून घेणार आहोत.

1) नाक वर-खाली करा – वाढत्या वयानुसार आपल्या हाडं आणि मांसपेशीत बदल होतो. त्यामुळं लहान मुलांच्या मालिशवर जास्त भर दिला जातो. त्यांच्या नाकाला योग्य शेप दिला जातो. यासाठी बोट नाकाच्या शेंड्यावर लावून वर खाली केलं जातं. यानं नाकाचा शेप योग्य राहतो.

2) नाकाची मालिश – मसाज करूनही नाक योग्य शेपमध्ये आणलं जाऊ शकतं. नाकाला तेल किंवा क्रिम लावून वर खाली किंवा उजवीकडे किंवा डावीकडे करून तसेच त्याची मसाज करून योग्य शेपमध्ये आणलं जाऊ शकतं. मसाज केल्यानं सायनस आणि मायग्रेनची समस्याही दूर होऊ शकते.

3) नाक डावी-उजवीकडे फिरवा – श्वास आत घेऊन नाक डावी-उजवीकडे फिरवा. यामुळं नाक शेपमध्ये येण्यास मदत होते. सोबतच नाकाच्या छिद्रांना बंद करा आणि उघडा. या व्यायामानं नाकाच्या मांसपेशींना आराम मिळतो.

4) नाक दोन्ही बाजूनं दाबा – नाक दोन्ही बाजूनं प्रेस केल्यानंही बारीक केलं जाऊ शकतं. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हातांच्या बोटांनी नाकाच्या दोन्ही बाजू दाबत शेंड्याच्या दिशेनं आणाव्यात. या व्यायामाचा खूप फायदा होतो.

5) श्वासांचा व्यायाम – यासाठी हाताच्या एका बोटानं नाकाचं एक छिद्र बंद करून दुसऱ्या छिद्रानं श्वास घ्या. पुन्हा याच प्रकारे दुसऱ्या बाजूनं छिद्र बंद करून मोकळ्या छिद्रातून श्वास घ्या. यानं नाक शेपमध्ये येण्यास खूप मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.