‘हे’ शेतकरी असणार PM-Kisan योजनेपासून अपात्र; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खते खरेदी करण्यासाठी निधी मिळावा यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सरकारने अमलात आणली आहे. मोदी सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ६ हजार रुपये दिले जाते, २ हजार रुपये प्रमाणे तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम पाठवली जाते. परंतु काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याचे दिसून येते.

दरम्यान, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा गरीब शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशी सरकारची योजना आहे. वेबसाइटवर या योजनेसंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि कोणाला नाही असे या वेबसाईटमध्ये स्पष्ट केले आहे. ज्यांच्या नावावर शेती आहे अशा व्यक्तींना या योजनेचा फायदा मिळणार आहे. जोपर्यंत शेती तुमच्या नावावर होत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ व्यक्तीला घेता येणार नाही. तर जे लाभार्थी आहेत परंतु अजून नोंदणी केली नाही. त्यांनी ३१ मार्चपूर्वी या योजनेकरता नोंदणी करा. ३१ मार्च पूर्वी नोंदणी करून तुमचा अर्ज स्विकारला गेल्यास होळीनंतर तुमच्या खात्यात २ हजार रुपये मिळून, पुढच्या एप्रिल आणि मे मध्ये हप्त्याचे देखील पैसे मिळणार आहेत.

तसेच सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अपात्र असणाऱ्या काही शेतकऱ्यांची यादी देखील स्पष्ट केली आहे. जाणून घ्या..

> संस्थात्मक शेतकरी.

> कुटुंबातील एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती पुढील श्रेणीत येतात व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी.

>  घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष.

> केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून).

> केंद्र आणि राज्य सरकारमधील १० हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला याचा लाभ नाही.

> गेल्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी या योजनेच्या बाहेर आहेत.

> तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेतली असाल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.

> नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांनाही या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. .