सहज उपलब्ध होणारे ‘हे’ 5 पदार्थ वाढवतात मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जर मधुमेह झाला तर हृदयरोग, स्ट्रोक, स्नायूंची कमजोरी आणि डोळ्यांचे तसेच किडनीचे आजार अशा अनेक समस्या येतात. कारण यामुळं व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. अशा व्यक्तींना आजारांचा संसर्ग होण्याचा धोकाही जास्त असतो.

काय सांगतात डॉक्टर ?
मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण मिळवायचं असेल तर योग्य प्रमाणात झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार खूप गरजेचा असतो. जर मधुमेह झाला असेल तर अनेक पोषकघटक असलेला संतुलित आहार घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा मधुमेह होतो तेव्हा आहारासंदर्भात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काय खावं काय खाऊ नये याची खूप काळजी घ्यावी लागते. आज आपण अशाच 5 पदार्थांबद्दल माहिती घेणार आहोत जे मधुमेह झालेल्या लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतील.

1) काबुली चणे – काबुली चण्यात व्हिटॅमिन ए, डी आणि ई तसेच जस्त असतं. याचा मधुमेही रुग्णांना खूप फायदा होतो. शरीरात साखरेचं प्रमाण जास्त झालं तर ते हृदयासाठी त्रासदायक ठरतं. चण्यातील जस्तामुळं हा धोका कमी होतो. यात तंतुमय पदार्थ खूप असतात. यामुळं साखर कमी करण्यास फायदा होतो.

2) गाजर – मधुमेही रुग्णांना काळानुसार दृष्टीच्या समस्या त्रास देतात. अशात त्यांना मोतीबिंदू, काचबिंदू होऊ शकतो. गाजरातील बिटा केरोटीन आणि ल्युटीनचा यासाठी खूप फायदा होतो. यात असणाऱ्या व्हिटॅमिन ए मुळं रोगप्रतिकारक शक्ती चांगली रहाते. गाजर लो ग्लायसेमिक असल्यानं शरीरात रक्तातील साखर वाढत नाही.

3) अक्रोड – अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असतं. हेच मधुमेही रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण अँटी ऑक्सिडंट आहे. डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार व्हिटॅमिन ई मधुमेही रुग्णांच्या साखरेच्या नियंत्रणात सुधारणा करते. यामुळं प्रतिकार शक्तीलाही फायदा होतो.

4) शिमला मिरची – शिमला मिरचीत व्हिटॅमिन सी असतं. यामुळं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याचा फायदा रक्तातील साखर योग्य ठेवण्यास आणि त्वचेचं आरोग्य वाढवण्यासाठीही होतो.

5) फॅटी सी फूड – साल्मन, सार्डिन मॅकरेल अशा माशांमध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. रिसर्चमधूनही ही गोष्ट समोर आली आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ खाणं टाळावं.