home page top 1

‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील बॉलिवूड इंडस्ट्री हि खूप मोठी आहे. संपूर्ण देशभरातून कलाकार बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र प्रत्येकालाच यामध्ये यश मिळते असे नाही. मात्र मुंबईत येऊन यश मिळवलेल्या कलाकारांची आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण सर्वात जास्त  सुपरस्टार दिलेल्या पाच राज्यातील अभिनेत्यांची नावे देणार आहोत.
भारतातील या पाच राज्यातून आले आहेत सर्वात अधिक स्टार

5) पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमधून बॉलिवूडमध्ये  मिथुन चक्रवर्ती, काजोल, जया बच्चन, बिपाशा बासू यांसारखे स्टार आले आहेत.

4) महाराष्ट्र – महाराष्ट्रातून आमिर खान, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर आणि  माधुरी दीक्षित यांसारख्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र हे देशातील एक सर्वात महत्वाचे राज्य आहे.

 3) उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधून बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासारखे अत्यंत लोकप्रिय कलाकार आले आहेत.

2) दिल्ली – दिल्लीमधून बॉलिवूडमध्ये शाहरुख खान, अजय देवगन, सैफ अली खान, नीतू, प्राण आणि  मधुबाला यांच्यासारख्या तगड्या अभिनेत्यांनी प्रवेश केला होता.

1) पंजाब – बॉलिवूडचे सर्वात पहिले सुपरस्टार राजेश खन्ना, सनी देओल, बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार, अमरीश पुरी, देव आनंद, नरगिस आणि  जूही चावला यांच्यासारख्या  कलाकारांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबच्या सर्वात अधिक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपले योगदान दिले आहे.

Loading...
You might also like