सहज उपलब्ध होणारी ‘ही’ 5 फुलं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक फुलं अशी आहेत जी आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच काही फुलांबद्दल आपण माहिती घेऊयात.

1) गुलाब – गुलाबाच्या पाकळ्या दररोज दुधात उकळून जर प्यायल्या तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय तुम्ही या पाकळ्या जर दूधासोबत वाटून चेहऱ्याला लावल्या तर चेहरा उजळतो.

2) सूर्यफूल – या फुलाच्या पाकळ्या नारळाच्या तेलात मिक्स करून काही दिवस उन्हात ठेवा. नंतर या तेलानं शरीराला मसाज करा. यामुळं त्वचेच्या समस्या आणि इंफेक्शन दूर होतं.

3) जुई – दात दुखत असेल किंवा हिरड्यांवर सूज आली असेल तर जुईची पानं खाल्ल्यानं फायदा होतो. जुईची पानं चावून बराच वेळ त्याचा रस तोंडात तसाच ठेवा आणि काही वेळानं चूळ भरा. यामुळं दातांच्या तक्रारी दूर होण्यास मदत मिळते.

4) जास्वंदी – ही फुले वाटून साखरेसोबत याचं सेवन करावं. यामुळं डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदा होतो. इतकंच नाही तर महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही जास्वंदीचे फूल गुणकारी ठरते.

5) चमेलीची पानं – माऊथ अल्सरसाठी याच्या पानांचा मोठा फायदा होतो. याची पानं चावल्यानं माऊथ अल्सरपासून सुटका मिळते. चमेलिची फुलं सकाळी डोळ्यांवर ठेवली तर डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.