‘हृदय’ राहील तरूण! ’या’ 7 गोष्टींची घ्या काळजी, होणार नाही ‘धोका’ !

पोलीसनामा ऑनलाइन – अलिकडे हृदयरोगाचे प्रमाण खुपच वाढले आहे. पूर्वी वयस्कर लोकांना होणारे हृदयरोग आता तरूणांमध्ये सुद्धा दिसू लागले आहेत. विशेषकरून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयरोग होण्याची कारणे अनेक आहेत. एकुणच जीवनशैली यासाठी खुप मोठ्याप्रमाणात जबाबदार असते. चुकीच्या सवयींमुळे हृदयरोगांचे प्रमाण वाढत आहे. जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण काही खास माहिती घेणार आहोत.

काय खावे, काय खाऊ नये

1 जेवताना वरून मीठ घेऊ नका. हे घातक आहे. फास्ट फूड टाळा. मिठामुळे हृदयाचं नुकसान होतं. मीठ आणि साखरेचं सेवन कमीत कमी करा.

2 कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ कमी खा. फास्ट फूड आणि जंक फूड फार कमी खा. याचा थेट प्रभाव हृदयावर पडतो. एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नका.

3 पांढर्‍या साखरेऐवजी ब्राउन शुगरचा वापर करू शकता. नॉन-रिफाइंड गूळ वापरा.

4 आरोग्य आणि हृदय चांगलं ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरतात ती वेगवेगळी फळं 5 वेगवेगळ्या हिरव्या भाज्या, सुकामेवा नट्स आणि सीड्स म्हणजेच, बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, कलिंगड इत्यादी खा.

6 दूध, दही, ताक सेवन करा. ग्रीन, ब्लॅक टीचं सेवन करा. यामुळे हृदय निरोगी राहतं.

7 डबाबंद पदार्थ खाऊ नका. रेडी टू इट म्हणजे सेमी कुक्ड पदार्थ जसे की, भाज्या, बिर्याणी, पराठे, मिठाई इत्यादी तसेच पॅकेटमधील ज्यूस, कोल्ड्रिंक टाळा.