उद्यापासून लागू होणार ‘हे’ 4 नवीन बदल, जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकिंग, रस्ते परिवहन आणि दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांशी संबंधित काही नवे बदल 15 आणि 16 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असाल तर हे लक्षात ठेवा की तुमच्या गाडीवर फास्टॅग असणे आवश्यक आहे. जर तुम्ही फास्टॅग लावलेला नसेल तर तो तात्काळ लावून घ्या. सोमवारी ट्रायचे नियम लागू होतील, ज्यात तीन दिवसांत नंबर पोर्ट करण्यात येईल असा दावा करण्यात आला आहे. 16 तारखेपासून एनईएफटीची 24 तास सुविधा असेल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षणी ऑनलाइन बँकिंग करुन व्यवहार करु शकतात.

नव्या नियमानुसार ग्राहक तीन कामकाजी दिवसात नंबर पोर्ट करु शकतील. दर दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करायचे असेल तर पाच कामकाजी दिवसात पोर्ट करुन मिळेल. आता याला 15 ते 20 दिवस लागतात. पोर्टिंग कोड तेव्हाच मिळेल जेव्हा ग्राहक सर्व अटी पूर्ण करतील. जसे कमीत कमी 90 दिवस कंपनीमध्ये कनेक्शन सक्रीय ठेवणे. त्यांनी आपली थकबाकी द्यावी लागेल. नंबर पोर्ट न करण्याची कोर्ट किंवा इतर कोणतीही कायदेशीर बंदी नसावी. पोर्टिंग कोड फक्त चार दिवस वैध असेल. या बदलानंतर 10 ते 15 डिसेंबर पर्यंत पोर्टिंग सुविधा बंद राहिलं.

जर वेळीची मर्यादा पुन्हा वाढत नाही तेव्हा सर्व राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्यावर डिजिटल पेमेंटची व्यवस्था फास्टॅग 15 डिसेंबरला लागू होईल. हे सर्व खासगी आणि व्यवसायिक वाहनांसाठी असेल. जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्ही फास्टॅगच्या लाइनमध्ये प्रवेश केला तर तुमच्याकडून दुप्पटीने टोल वसूल केला जाईल. महामार्गावर सध्या एक हायब्रिड लाईन आहे, जेथे फास्टॅग नसलेल्या वाहनांच्या टोलची वसूली करण्यात येईल.

बँक सोमवारपासून 24 तास एनईएफटीची सुविधा देईन. 15 डिसेंबरपासून 12.30 वाजेपासून ही सुविधा सुरु होईल. सध्या कामकाजाच्या तासात सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एनईएफटीची सुविधा आहे. यात व्यवहार न अनसक्सेस झाल्यास दोन तासात पैसे परत मिळतील आणि क्रेडिटचा एसएमएस देखील मिळेल. एनईएफटी आणि आरटीजीएसवरील शुल्क पहिल्यांदाच घेणे बंद केले आहे.

आयसीआयसी बँक 15 डिसेंबरपासून ग्राहकांना चार वेळा रोख रक्कमेची सुविधा देणार आहे. त्यानंतर व्यवहारावर 150 रुपये शुल्क आकारण्यात येईल. होम ब्रांचमध्ये निशुल्क रक्कमेची जमा किंंवा काढण्याची अधिकतम मर्यादा 2 लाख रुपये आहे. यानंतर प्रति हजार रुपयांवर पाच रुपये शुल्क आकारण्यात येईल. यात देखील किमान शुल्क 150 रुपये असेल. होम ब्रांचमध्ये रोज 25 हजार रुपयांपर्यंत जमा आणि काढण्यास कोणतेही शुल्क नसेल. त्यानंतर वरील प्रमाणे शुल्क आकरण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like